गोव्यात मराठी भाषकांचा टक्का घटला

goa
goa

पणजी: गोव्यातील मराठी भाषकांचा टक्का घटला आहे. केंद्र सरकारने 2011 मध्ये केलेल्या जनगणनेची भाषक आकडेवारी जाहीर केली त्यातून ही माहिती समोर आली आहे. गोव्यात 2001 च्या आकडेवारीनुसार 3 लाख 4 हजार 208 जण मराठी भाषक होते. ती संख्या 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार 1 लाख 58 हजार 787 झाली आहे. म्हणजे 10 वर्षात मराठी भाषकांची संख्या 1 लाख 45 हजार 421 ने घटली आहे.

देशात मराठी मातृभाषा म्हणून नोंद केलेल्यांची संख्या 8.30 कोटी आहे. माय मराठीचा बोलू कौतुके! देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या मातृभाषांमध्ये मराठीने तेलुगूलाही मागे टाकले आहे. देशात हिंदी मायबोली असणाऱ्यांची संख्या मोठी असली,  तरीसुद्धा बंगाली दुसऱ्या स्थानी आहे. हिंदी भाषकांच्या संख्येमध्येही 25 टक्के वाढ झाली आहे. बंगाली भाषकांच्या संख्येमध्ये 16.63 टक्के एवढी वाढ झाली आहे; तर तेलुगू भाषेचे तिसरे स्थान आता मराठीने पटकावले आहे. संस्कृतप्रमाणेच ऊर्दू भाषकांच्या संख्येमध्येही मोठी घसरण झाली असून,  ती आता सहाव्या स्थानावरून सातव्या स्थानी गेली आहे. येथे गुजराती भाषेने मात्र आघाडी घेतल्याचे दिसून येते.

कोकणीलाही असाच अनुभव आला आहे. देशात 22.56 लाख लोकांनी आपली मातृभाषा कोकणी असल्याची नोंद 2011 च्या जणगणनेत केली आहे पण 2001 च्या आकडेवारीच्या तुलनेत ही संख्या 2.32 लाखांनी घटली आहे. गोव्यात 9.64 लाख लोकांनी आपली मातृभाषा कोकणी असल्याची नोंद केली आहे. गोव्यात 67923 जणांनी आपली मातृभाषा कन्नड म्हणून नोंद केली आहे. 1055 जणांची मातृभाषा संस्कृत आहे. राज्यात 41242 जणांची मातृभाषा उर्दू आहे. कोकणीत गोरबोली-गोरू-गोरवाणी, कोकणी, कुडुबी-कुडुंबी, मालवणी व नवायत या भाषांचा समावेश केला आहे. देशात 22, 56, 502 जणांनी आपली मातृभाषा कोकणी असल्याचे म्हटले असून त्यात गोरबोली 50259, कोकणी 2, 46, 902, कुडुंबी 17, 209, मालवणी 23617, नवायत 13123 तर इतरांची संख्या 5388 एवढी आहे.

घटनेच्या आठव्या परिशिष्टातील 22भाषांच्या तुलनेत कोकणी ही एकमेव भाषा आहे जीची घट सर्वाधिक आहे. 22 पैकी कोकणी व उर्दू या दोनच मातृभाषिकांची संख्या घटली आहे. कोकणीची घट 9.34 टक्के एवढी आहे. देशातील 22 भाषांमध्ये कोकणी आता 19 व्या क्रमांकावर पोहचली आहे. 2001 मध्ये 24.89 लाख लोकांनी आपली मातृभाषा कोकणी म्हणून नोंद केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com