अंमलीपदार्थविरोधी दिनानिमित्त मॅरॅथॉन स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

गोवा पोलिस खात्याच्या अंमलीपदार्थविरोधी कक्षातर्फे आज अंमलीपदार्थविरोधी दिनानिमित्त मॅरॉथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांनी केली.

पणजी(गोवा)- गोवा पोलिस खात्याच्या अंमलीपदार्थविरोधी कक्षातर्फे आज अंमलीपदार्थविरोधी दिनानिमित्त मॅरॉथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांनी केली.

अंमलीपदार्थापासून तरुणांनी दूर राहावे व त्याचे सेवन करू नये असा संदेश यावेळी या मॅरॉथॉन स्पर्धेतून देण्यात आला. बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम ते पणजी फेरीबोटपर्यंत ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने तरुण व तरुणींनी भाग घेतला.

Web Title: Marathon tournaments on the day of anti-Narcissistic Day