मडगावचा दिंडी उत्सव आज 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

यंदा नूतन हरी मंदिरात दिंडी उत्सव साजरा करण्यात येणार असून यंदाचा 109 वा दिंडी उत्सव आहे. दिग्गज गायकांच्या मैफलीसह दिंडी पथक, रांगोळी, पणती आरास, आकाशंकंदील, वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडी उत्सवाचे आयोजन हरी मंदिर देवस्थानतर्फे करण्यात येत असून या उत्सवात कोब विठ्ठल मंदिरासह, दामबाबाले घोडे, साॅलीड पार्टी ट्रस्ट, युव संजीवनी, मडगाव सम्राट क्लब आदी संस्थांचा सहभाग आहे. 

मडगाव : महाराष्ट्रातील वारकरी परंपरेशी नाते सांगणारा मडगाव - गोवा येथील प्रसिद्ध दिंडी उत्सव आज (21 नोव्हेंबर) साजरा करण्यात येत असून या उत्सवात अनेक संस्थांनी विविधरंगी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पुण्याच्या गायिका रेवा नातू व गायक चैतन्य कुलकर्णी यांचे गायन यंदाच्या दिंडी उत्सवाचे मुख्य आकर्षण असेल. हरी मंदिर मंडपात 22 रोजी मुंबईचे नामांकीत गायक पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने दिंडी उत्सवाचा समारोप होईल.  

यंदा नूतन हरी मंदिरात दिंडी उत्सव साजरा करण्यात येणार असून यंदाचा 109 वा दिंडी उत्सव आहे. दिग्गज गायकांच्या मैफलीसह दिंडी पथक, रांगोळी, पणती आरास, आकाशंकंदील, वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडी उत्सवाचे आयोजन हरी मंदिर देवस्थानतर्फे करण्यात येत असून या उत्सवात कोब विठ्ठल मंदिरासह, दामबाबाले घोडे, साॅलीड पार्टी ट्रस्ट, युव संजीवनी, मडगाव सम्राट क्लब आदी संस्थांचा सहभाग आहे. 

रेवा नातू व चैतन्य कुलकर्णी यांची पहिली बैठक संध्याकाळी 6.30 वाजता हरी मंदिराजवळच्या व्यासपीठावर होणार आहे. न्यू मार्केट येथील युको बॅंकेसमोरच्या व्यासपीठावर दुसरी व पालिका चौकात रात्री 11 वाजता तिसरी बैठक होणार आहे, याला जोडूनच युव संजीवनी संस्थेने कोंब येथे रात्री 10 वाजता `स्वर दिंडी` हा हिंदी, मराठी, कोकणी गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात रचित अग्रवाल (मुंबई), सिद्धेश जाधव (मुंबई), प्रज्योती जगदाळे (कोल्हापूर) व गोमंतकीय गायिका समीक्षा भोबे काकोडकर यांचा सहभाग असेल. संगीता अभ्यंकर या कायर्क्रमाचे सूत्रनिवेदन करतील.  

 हरी मंदिर मंडपात 22 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता पं. रघुनंदन पणशीकर यांच्या `सावळा गे माये` या मैफलीने दिंडी उत्सवाचा समारोप हईल.  

Web Title: margao cultural festival