पावसाळी साहित्याने बाजारपेठा फुलू लागल्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

पणजी : राज्यात मान्सूनचे आगमन येत्या काही दिवसातच होणार असून मान्सूनच्या स्वागतासाठी राजधानी पणजीतील बाजारपेठाही पावसाळी साहित्याने फुलल्या आहेत. बाजारपेठेत सर्वत्र रेनकोट, छत्र्या, पावसाळी चप्पले आणि इतर पावसाळी साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे.

पणजी : राज्यात मान्सूनचे आगमन येत्या काही दिवसातच होणार असून मान्सूनच्या स्वागतासाठी राजधानी पणजीतील बाजारपेठाही पावसाळी साहित्याने फुलल्या आहेत. बाजारपेठेत सर्वत्र रेनकोट, छत्र्या, पावसाळी चप्पले आणि इतर पावसाळी साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे.

काही दिवसांत शाळांची सुट्‌टीही संपणार असल्याने ही खरेदी करण्यासाठी बालचमू आणि पालकवर्ग बाजारात गर्दी करताना दिसून येत आहे.  मागीलवर्षी पेक्षा यावर्षी पावसाळी साहित्याची खरेदी कमी प्रमाणात केली जात असल्याने काही दुकानदारांचे म्हणणे आहे. छत्र्यांची किंमत कमीत कमी 99 रुपयांपासून सुरू होऊन आकारातील बदल आणि दर्जानुसार 500 रुपयांपर्यंतची आहे. रेनकोटच्या बाबतीत झील आणि रिअल या दोन ब्रॅंडची सध्या चलती आहे. या दोन्ही ब्रॅंडचे रेनकोट 700 रुपयांपासून 1600 ते 1700 रुपयांच्या किंमतीपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. 300 रुपयापासून किंमत असणारे इतर रेनकोटही बाजारात उपलब्ध आहेत. 

पावसाळ्यात येणाऱ्या पावसाळी चप्पलांच्या फॅशनची जादू पसरायला सुरू झालेली असून रबर आणि प्लॅस्टिकचे वेगवेगळ्या फॅशनमधील बूट आणि चप्पलही दाखल झाले आहेत. चप्पलांच्या बाबतीत फॅशन, स्टाइल आणि दर्जानुसार किमती कमी जास्त झालेल्या पहायला मिळतात. मुलींचे आणि लहान मुलांचे प्लॅस्टिकचे बूट आणि चप्पल 99 रुपयापासून सुरू होतात पण यामधील चांगल्या दर्जाचे चप्पल 400 रुपया पर्यंतच्या किमतीत बाजारात उपलब्ध आहेत. मुलींच्या तुलनेत मुलांच्या चप्पलांच्या किमती अधिक असल्याचे पहायला मिळते. मुलांच्या चप्पलांच्या किमती 200 रुपयांच्या आसपास सुरू होऊन नंतर सुमारे 500 ते 600 रुपयांपर्यंत विस्तारत जातात. या किमती बाजारात असणाऱ्या दुकानातील असून ब्रॅंडेड वस्तूंच्या किमती  त्या ब्रॅंडप्रमाणे ब्रॅंड शोरूममध्ये उपलब्ध आहेत.  

Web Title: markets bloom with rainy seasons material