विवाहितेने बॉयफ्रेंडसाठी गाठला क्रूरतेचा कळस! पतीसह ४ मुलांची केली हत्या ; आता... - Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Crime News : विवाहितेने बॉयफ्रेंडसाठी गाठला क्रूरतेचा कळस! पतीसह ४ मुलांची केली हत्या ; आता...

राजस्थान : अलवरमध्ये एका महिलेने तिच्या प्रियकरासह पती आणि चार मुलांचा गळा चिरून हत्या केली होती. ही घटना २०१७ ची आहे. या घटनेला आता ६ वर्ष झाले. मात्र आज देखील हे हत्याकांड आठवले तर अंगावर शहारे येतात. 

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील शिवाजी पार्क पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली होती. विवाहीत महिलेला ५ जणांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने संतोष उर्फ ​​संध्या आणि तिचा प्रियकर हनुमान यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

काय घडले होते ?

राजस्थानमध्ये ५ जणांच्या हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले होते. एका महिलेने तिचा पती, ३ मुले आणि १ पुतण्याची प्रियकर आणि त्याच्या साथीदारांच्या सहाय्याने हत्या केली होती. आरोपी महिलेसमोरच जनावरे कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चाकूने तिच्या कुटुंबातील ५ जणांचा गळा चिरून हत्या करण्यात आली. एवढेच नाही तर ही महिला रात्रभर तिच्याच कुटुंबातील ५ जणांच्या मृतदेहाजवळ बसून राहिली होती.

या प्रकरणी पोलिसांनी मृत बनवारीलालची पत्नी, तिच्या प्रियकरासह दोन सुपारी बहाद्दरांना अटक केली होती. दरम्यान तब्बल ६ वर्षानंतर न्यायालयाने निकाल देताना सर्वांनाच दोषी मानले आहे. आज दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पती आणि मोठा मुलगा महिलेच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याचे हत्येचे मुख्य कारण होते.  पती आणि मोठ्या मुलाला मारण्याचा आरोपी महिलेचा प्लॅन होता. मात्र प्रियकराने संपूर्ण कुटुंबाची हत्या केली.