Mangalyaan : सहा महिन्यांसाठी पाठवलेल्या 'मॉम'ने केला 5 वर्षांचा प्रवास पूर्ण!

वृत्तसंस्था
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

अत्यंत कमी खर्चातील मंगळयान मोहिमेचे यश महत्त्वाचे मानले जाते. या मोहिमेचा खर्च हा हॉलिवूडचा चित्रपट 'ग्रॅव्हिटी' अणि नासाच्या मावेन ऑर्बिटरपेक्षाही बराच कमी होता.

नवी दिल्ली : 'इस्रो'ने सहा महिन्यांसाठी कार्यान्वित केलेल्या मंगळयान मिशनला मंगळवारी (ता.24) पाच वर्षे पूर्ण झाली. ही मोहीम आणखी काही काळ सुरू राहू शकते, असे 'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन यांनी म्हटले आहे. 

गेल्या पाच वर्षांत मार्स ऑर्बिटर मिशनने (एमओएम) 'इस्रो'ला ऑर्बिटरकडून मिळालेल्या छायाचित्राच्या मदतीने मार्शियन ऍटलस तयार करण्यात मदत केली आहे. हे यान अजूनही काम करीत आहे आणि छायाचित्रे पाठवत आहे. मार्स ऑर्बिटरने आतापर्यंत दोन टेराबाइट छायाचित्रे पाठविली आहेत.

मंगळयान-2 वर काम सुरू आहे. मात्र, सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही. अत्यंत कमी खर्चातील मंगळयान मोहिमेचे यश महत्त्वाचे मानले जाते. या मोहिमेचा खर्च हा हॉलिवूडचा चित्रपट 'ग्रॅव्हिटी' अणि नासाच्या मावेन ऑर्बिटरपेक्षाही बराच कमी होता.

Image may contain: sky

मंगळयानाच्या लाँच व्हेईकल स्पेसक्राप्ट आणि ग्राउंड सेगमेंटची किंमत 450 कोटी रुपये होती. यानाला 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगळ मोहिमेवर पाठविले होते. त्यानंतर मंगळयानाने 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळ कक्षेत स्थापन करून इतिहास घडविला.

Image may contain: text

पहिल्याच प्रयत्नात मंगळयान मोहीम यशस्वी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. अमेरिका आणि पूर्वीच्या सोव्हियत संघाने वारंवार प्रयत्न केल्यानंतर मंगळ मोहिमेला यश आले.

Image may contain: sky and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mars Orbiter Mission completed 5 years in Mars orbit on 24 September 2019