हुतात्मा संदीप उन्नीकृष्णन अनेकांसाठी ठरले प्रेरणास्रोत

हुतात्मा संदीप उन्नीकृष्णन अनेकांसाठी ठरले प्रेरणास्रोत

बंगळूर- मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या येथील दुमजली घरामध्ये सर्वत्र त्यांची छायाचित्रे लावण्यात आलेली आहेत. या घरामध्ये ठेवण्यात आलेल्या अनेक वस्तू, लेख, मेजर संदीप यांची आठवण करून देतात. मेजर संदीप यांच्या या सर्व आठवणी त्यांच्या कुटुंबीयांबरोबरच येथे भेट देणाऱ्या अनेकांसाठी एकीकडे वेदनादाई आहेत, तर दुसरीकडे प्रेरणादाई ठरत आहेत. 

राष्ट्रीय सुरक्षा पथकामध्ये (एनएसजी) कमांडो म्हणून कर्तव्य बजावत असलेल्या मेजर संदीप यांना मुंबईवरील दहशवादी हल्ल्यावेळी हौतात्म्य प्राप्त झाले होते. आपल्या मुलाने गाजविलेल्या शौर्याची माहिती मेजर संदीप यांचे वडील के. उन्नीकृष्णन हे अतिशय अभिमानाने देतात. ""आम्ही आमचा तरुण मुलगा गमावला असला, तरी जेव्हा जेव्हा संदीपचे नाव घेतल्यानंतर त्याच्या शौर्याला सलाम करत टाळ्यांचा कडकडाट होतो त्या वेळी वाटणारा अभिमान शब्दांत व्यक्त करता येणार नाही,'' अशी प्रतिक्रिया मेजर संदीप यांच्या वडिलांनी व्यक्त केली. 

मेजर संदीप यांच्या घराला वस्तुसंग्रहालयाचे रूप आले आहे. येथे भेट देणाऱ्या प्रत्येकासाठी हे घर प्रेरणेचा स्त्रोत ठरते आहे. आपल्या तरुण मुलाच्या जाण्याचे दुःख बाजूला सारून मेजर संदीप यांचे वडील मुलाच्या शौर्याबरोबरच त्याच्या दायित्वाची उदाहरणे सांगतात. संदीप हुतात्मा झाल्यानंतर मला त्याच्या व्यक्तिमत्त्वातील सामाजिक दायित्वाच्या पैलूबाबत माहिती मिळाल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. के. उन्नीकृष्णन हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) निवृत्त अधिकारी आहेत. 

मुंबईवरील हल्ल्यावेळी ताज पॅलेस हॉटेलमध्ये दहशतवाद्यांचा मुकाबला करताना मेजर संदीप हे हुतात्मा झाले होते. या वेळी त्यांनी दाखविलेल्या शौर्याबद्दल त्यांना अशोकचक्र सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com