हुतात्मा जवानाचे पार्थिव तिरंग्याऐवजी राजकीय पक्षाच्या झेंड्यात

martyrs body wrapped in political party flags instead of the tricolor at odisha
martyrs body wrapped in political party flags instead of the tricolor at odisha

भुवनेश्वर : जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथे दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटामध्ये हुतात्मा झालेल्या जवानाचे पार्थिव तिरंग्याऐवजी राजकीय पक्षाच्या झेंड्यामध्ये लपेटल्याचे आढळून आले आहे. एका नेटिझन्सने ट्विटरवर हे छायाचित्र अपलोड केले आहे.

हुतात्मा जवानांचे पार्थिव हे राष्ट्रध्वजामध्ये लपेटले जाते. पुढे राष्ट्रध्वज हटवून पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात. पार्थिव तिरंग्यामध्ये लपेटणे कोणत्याही जवानाच्या सर्वोच्च बलिदानाचे प्रतिक आहे. मात्र, तिरंग्याऐवजी एका राजकीय पक्षाच्या ध्वजामध्ये हुतात्मा जवान अजितकुमार साहू यांचे पार्थिव लपेटल्याची धक्कादायक बाब ओडिशामधून समोर आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथे दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात 44 राष्ट्रीय रायफल्सचे जवान अजितकुमार साहू हे सोमवारी (ता. 17) हुतात्मा झाले. त्यांचे पार्थिव त्यांच्या ओडिशातील मूळगावी आणण्यात आले. अंत्यसंस्कारपूर्वी ते चक्क बिजू जनता दलाच्या (बीजेडी) झेंड्यामध्ये लपेटण्यात आले होते. भाजपचे स्थानिक नेते बैजयंत जय पांडा यांनी यावर आक्षेप घेतला आहे. सत्ताधारी पक्ष बिजू जनता दलावर त्यांनी टीका केली आहे. शिवाय, बिजदकडून हुतात्मा जवानाच्या मृत्यूचे राजकारण केले जात आहे, असा आरोपही पांडा यांनी केला आहे.

दरम्यान, हुतात्मा जवान अजितकुमार साहू त्यांच्या पार्थिवाला बटालियनकडून 120 बंदुकीच्या फैरींनी सलामी देण्यात आली. यावेळी ओडिशाचे राज्यपाल गणेशी लाल, मंत्री अशोक पांडा आणि प्रफुल्ल मलिक, आमदार रानेंद्र प्रताप स्वान आणि भाजप नेते प्रकाश मिश्रा यांनी हुतात्मा साहू यांना पुष्पांजली वाहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com