हुतात्मा जवानाच्या मुलींनी तरीही दिली परीक्षा

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

गया - उरीतील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले जवान सुनील कुमार यांच्या मुलींनी वडीलांच्या निधनाची बातमी कळूनही मोठ्या धैर्याने शाळेत जाऊन परीक्षा दिली.

गया - उरीतील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले जवान सुनील कुमार यांच्या मुलींनी वडीलांच्या निधनाची बातमी कळूनही मोठ्या धैर्याने शाळेत जाऊन परीक्षा दिली.

गया येथील डीव्ही शाळेत सुनील कुमार यांच्या तिन्ही मुली शिकतात. त्यांची मोठी मुलगी आरती आठवीमध्ये, दुसरी अंशू सहावीमध्ये आणि तिसरी अंशिका दुसरीमध्ये शिकते. उरी येथील हल्ल्यात त्यांचे वडील हुतात्मा झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहचली. मात्र, या तिघींचीही परीक्षा होती. पण, या तिघींनी वडिलांच्या निधनाची बातमी कळल्यानंतरही शाळेत जाऊन परीक्षा दिली. या मुलींचे देशभरातून कौतुक करण्यात येत आहे. त्यांचे अख्खे कुटुंब दुःखात असताना यांनी मोठ्या धैर्याने परीक्षा दिली.

आम्हाला वडीलांचे स्वप्न पूर्ण करायेच आहे. जेव्हा आम्ही वडीलांशी बोललो तेव्हा त्यांनी परीक्षेबद्दल आम्हाला विचारले होते, अशी प्रतिक्रिया या मुलींनी दिली आहे. अंशिका या त्यांच्या लहान मुलीला वडीलांसोबत अखेरचे केव्हा बोलले हे आठवत नव्हते.

Web Title: Martyr's daughters still adding the test