ट्विटरवर 'शहीद दिवस', 'भगत सिंग' ट्रेण्डमध्ये !

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

नवी दिल्ली- देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिवाची बाजी लावणारे स्वातंत्र्य सैनिक भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली तो दिवस इतिहासात या कोरला गेला आहे. त्यांच्या स्मरणार्थ आजचा (23 मार्च) दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या ट्विटरवर शहीद दिवस व भगत सिंग असा ट्रेण्ड टॉप टेन मध्ये पहायला मिळाला.

देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. नेटिझन्सनी या हुतात्म्यांना सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आदरांजली वाहिली. ट्विटर, फेसबुक व व्हॉट्सऍपवरून छायाचित्रे शेअर होताना दिसत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रिकेटपटू गौतम गंभीरसह अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली.

इंग्रजांनी 86 वर्षांपूर्वी भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना फाशी दिली. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱया या हुतात्मांना आदरांजली वाहून हा दिवस देशभरात हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. 23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी तिघांना फाशी देण्यात आली. फाशीच्या वेळी तिघांनी ....'मेरा रँग दे बसन्ती चोला, मेरा रँग दे; मेरा रँग दे बसन्ती चोला। माय रँग दे बसन्ती चोला।।' हे गाणे गायले होते.

Web Title: On Martyr's Day, Twitter Honours Bhagat Singh, Rajguru And Sukhdev