हाफिज सईद, दाऊद इब्राहिम दहशतवादी घोषित; अमेरिकेचाही पाठिंबा

हाफिज सईद, दाऊद इब्राहिम दहशतवादी घोषित; अमेरिकेचाही पाठिंबा

नवी दिल्ली : कुख्यात दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तैयबा'चा म्होरक्या हाफिज सईद आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसह अन्य काही दहशतवाद्यांना सुधारित कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले. भारताच्या या निर्णयाला आता अमेरिकेने पाठिंबा दर्शवला आहे.

दहशतवादी घोषित करण्यात आलेल्यांमध्ये मौलाना मसूद अजहर, हाफिज सईद, झाकि-उर-रहमान आणि दाऊद इब्राहिम या चौघांच्या नावांचा समावेश आहे. भारत सरकारच्या या निर्णयाला आपला पाठिंबा असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. तसेच अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांतील दहशतवादविरोधी लढ्याबाबतचे सहकार्य वाढण्यास फायदा होईल, असे अमेरिकेकडून सांगण्यात आले.

दरम्यान, 1967 मधील कायद्याला मागील महिन्यात संसदेमध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर आता सुधारित कायद्यांतर्गत दहशतवादी ठरवणाऱ्यांमध्ये पहिल्यांदाच या चौघांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com