ती आली मसाज करायला अन्...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

आधुनिक युगात आता सर्वच साेयीसुविधा आॅनलाइन उपलब्ध झाल्या आहेत. त्याचा आता लाभही माेठ्या प्रमाणात घेतला जात आहे. परंतू या माध्यमातून फसवणूक देखील हाेत  आहे.  

दिल्ली : आधुनिक युगात आता सर्वच साेयीसुविधा आॅनलाइन उपलब्ध झाल्या आहेत. त्याचा आता लाभही माेठ्या प्रमाणात घेतला जात आहे. परंतू या माध्यमातून फसवणूक देखील हाेत  आहे.  

सध्या मसाज पार्लर, स्पा इत्यादी सुविधांचा लाभ घेणाऱ्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून या सेवा अगदी घरपोच मिळू लागल्या आहेत. पण, या सेवांचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. कारण, अनेकदा मसाजच्या नावाखाली अनेक गैरप्रकारही चालतात. अशाच एका घटनेत मसाज करणाऱ्या महिलेने मौल्यवान अंगठी पळवल्याचं उघड झालं आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, 3 नोव्हेंबर रोजी गुरुग्राम येथे ही घटना घडली. पीडित तरुणीने एका मसाज अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मसाज करवून घेण्यासाठी नोंदणी केली होती.

त्यानुसार अॅप्लिकेशनकडून एक महिला 3 तारखेला सायंकाळी सहा वाजता तरुणीच्या घरी पोहोचली. मसाज करण्यापूर्वी अंगठी, बांगड्या आणि अन्य दागिने बाथरूममध्ये काढून ठेवले होते. सात वाजता मसाज झाल्यानंतर तरुणीने मसाजचे पैसे चुकते केले. पैसे घेण्यापूर्वी महिलेने हात धुण्यासाठी बाथरूममध्ये जाण्याची परवानगी मागितली.

दरम्यान, तरुणीने तिला बाथरूममध्ये जाण्याची परवानगी दिली. मसाज करणाऱ्या महिलेने बाथरुममध्ये हात धुतले आणि ती बाहेर येऊन पैसे घेऊन निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी तरुणीला आपल्या दागिन्यांमधून अंगठी गायब झाल्याचं आढळलं. ही अंगठी त्यांच्या पारंपरिक दागिन्यांपैकी एक होती. त्यामुळे त्या अंगठीची किंमत तब्बल पाच लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे. तरुणीने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: massage woman theft diamond ring

टॅग्स