भूस्खलनात लष्कराचा तळ उध्वस्त; अनेक जवान दबले, 13 जणांचा मृत्यू

सध्या घटनास्थळी मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
Manipur
Manipur

इम्फाळ : मुसळधार पावसामुळे मणिपूरमध्ये (Manipur) भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. यात घटनेत लष्कराचा एक कॅम्प (Army Camp) मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला गेल्याचे सांगितले जात असून, आतापर्यंत सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अद्यापही अनेक जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत 19 जणांना वाचवण्यात यश आले असून, गंभीर जखमींना नोनी आर्मी मेडिकल युनिटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहे. सध्या घटनास्थळी मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. तुपुल रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे. (Massive Landslide In Manipur News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, जिरीबामला इम्फाळशी जोडण्यासाठी एक रेल्वे मार्ग तयार करण्यात येत होता, ज्याच्या संरक्षणासाठी 107 टेरिटोरिल तुकडीचे जवान तैनात करण्यात आले होते. बुधवारी रात्री येथे मोठ्या प्रमाणात पाऊत झाल्याने अचानक भूस्खलन (Landslide) झाले. ज्यात अनेकजण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच याठिकाणी लष्कर, आसाम रायफल्स, मणिपूर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

अमित शाहांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

दरम्यान, या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी (Amit Shah) मणिपूरमधील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ भूस्खलन घटनेनंतर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com