बेळगावच्या पांगूळ गल्लीत मास्टरप्लॅन सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

बेळगाव - पांगूळ गल्लीतील मास्टरप्लॅनला सोमवारी (ता.12)  सुरूवात झाली. इमारत मालकांनी स्वतःहून जंप्स व बांधकाम हटविण्यास सुरूवात केली. केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्या निधनामुळे सोमवारी शासकीय सुटी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे महापालिका यंत्रणा मास्टरप्लॅनमध्ये सहभागी झाली नाही.

बेळगाव - पांगूळ गल्लीतील मास्टरप्लॅनला सोमवारी (ता.12)  सुरूवात झाली. इमारत मालकांनी स्वतःहून जंप्स व बांधकाम हटविण्यास सुरूवात केली. केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्या निधनामुळे सोमवारी शासकीय सुटी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे महापालिका यंत्रणा मास्टरप्लॅनमध्ये सहभागी झाली नाही.

अनंतकुमार यांच्या निधनामुळे आमदार अनिल बेनके बंगळूरला रवाना झाले, त्यामुळेही आमदारही पांगूळ गल्लीत गेले नाहीत. पण व्यापारी व रहिवाशानी स्वतःहून मास्टरप्लॅन सुरू केला त्यामुळे महापालिकेचे काम सोपे झाले. काही व्यापाऱ्यांनी 2015 सालचा न्यायालयाचा स्थगिती आदेश आस्थापनांसमोर प्रदर्शित केल्यामुळे मास्टरप्लॅनला विरोध होणार का? अशी शंका उपस्थित झाली होती. पण गल्लीतील व्यापाऱ्यांनी एक दिवस आधीच जंप्स हटविण्यास सुरूवात केली होती.

रविवारी रात्री गल्लीतील जैन मंदीर परीसरातील व्यापाऱ्यांनी जंप्स हटविण्यास सुरूवात केल्यानंतर अन्य व्यापाऱ्यांनीही त्यांचे अनुकरण केले होते. त्याआधी माजी नगरसेवक रायमन वाझ व गल्लीतील काही नागरीकांनी व्यावसायीकांची भेट घेवून मास्टरप्लॅनला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला व्यावसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

पांगूळ गल्लीतील रस्ता 30 फूट रूंद होणार आहे. त्यासाठी दिवाळीच्या आधी आरेखन करण्यात आले आहे. पांगूळ गल्लीत मास्टरप्लॅन राबविण्याचा निर्णय झाल्यानंतर पंच मंडळी, नागरिक व व्यापारी यांची बैठक झाली होती. बैठकीत 30 फूट रूंदीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली होती. आमदार बेनके यानी बैठक घेतल्यावर लागलीच म्हणजे दुसऱ्यादिवशी गल्लीत आरेखन करण्यात आले होते. 12 नोव्हेंबर रोजी मास्टरप्लॅन सुरू करण्याचा निर्णयही त्याचवेळी झाला होता.

Web Title: Masterplan work start in Pangulgali in Belgaum