esakal | मामाने केलेल्या बलात्कारामुळे महिला गरोदर; नवऱ्यानं घेतलं नाही घरात
sakal

बोलून बातमी शोधा

Crime-Scene

बिहारच्या कटीहार जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बायकोवर झालेल्या बलात्कारामुळे तिच्या नवऱ्याने तिला नांदवण्यास नकार दिला आहे. 20 वर्षीय तरुणी आजोबांच्या घरी गेली असताना तिच्या मामानेच तिच्यावर वारंवार बलात्कार केला. यामुळे ती गरोदर राहिली. आता ती सासरी गेली असता तिच्या नवऱ्याने तिला घरात घेण्यास नकार दिलाय.

मामाने केलेल्या बलात्कारामुळे महिला गरोदर; नवऱ्यानं घेतलं नाही घरात

sakal_logo
By
पीटीआय

पाटणा - बिहारच्या कटीहार जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बायकोवर झालेल्या बलात्कारामुळे तिच्या नवऱ्याने तिला नांदवण्यास नकार दिला आहे. 20 वर्षीय तरुणी आजोबांच्या घरी गेली असताना तिच्या मामानेच तिच्यावर वारंवार बलात्कार केला. यामुळे ती गरोदर राहिली. आता ती सासरी गेली असता तिच्या नवऱ्याने तिला घरात घेण्यास नकार दिलाय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फालका पोलिस स्टेशनच्या क्षेत्रात ही घटना घडलीय. त्यानंतर त्या महिलेने पोलिसांत तिच्या मामाविरोधात बलात्काराची तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, त्यात केवळ मामाच नव्हे तर इतर चौघांविरोधातही तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यात आजोबांनी मारहाण करुन घराबाहेर काढल्याचाही उल्लेख आहे. महिलेच्या आईवडीलांचे निधन झाले असून, ती गेल्या 9 महिन्यांपासून आजोबांच्या घरी राहत आहे. 

Breaking: सचिन पायलट पोहोचले, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या घरी

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या महिलेला तिच्या पतीने घरात घेण्यास नकार दिला असून तिच्या पोटात ज्याचं बाळ आहे त्याच व्यक्तीसोबत तिने राहावं, असं सांगितलं आहे. सुरुवातीला महिलेच्या मामाने 2 लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. पण, नंतर त्यास नकार दिला. आता ती महिला आजोळी राहत आहे. सध्या पीडितेचा मामा फरार असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

Edited By - Prashant Patil