Mathura case : शाही इदगाहचा सर्वेक्षण अहवाल 20 जानेवारीपर्यंत द्या; न्यायालयाचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mathura case

Mathura case : शाही इदगाहचा सर्वेक्षण अहवाल 20 जानेवारीपर्यंत द्या; न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली - श्रीकृष्ण जन्मभूमी वादाशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना मथुरा न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. मथुरा दिवाणी न्यायालयाच्या वरिष्ठ बेंचने शाही ईदगाहच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. दिवाणी न्यायाधीशांच्या वरिष्ठ बेंचने हिंदूंच्या अपिलावर हा आदेश दिला आहे. (Mathura case news in Marathi)

हेही वाचा: Eknath Shinde : खोक्यांच्या चौकशीसाठी तयार, आमची केवळ...; संदीपान भूमरेंनी राऊतांना सुनावलं

श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वादासंदर्भात हिंदू पक्षाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मथुरेच्या दिवाणी न्यायालयाच्या वरिष्ठ बेंचसमोर आज सुनावणी झाली. हिंदू पक्षाकडून दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना शाही ईदगाहचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले.

मथुरेच्या दिवाणी न्यायालयाच्या वरिष्ठ बेचने आपल्या आदेशात सर्वेक्षणासाठी अंतिम मुदत दिली आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल २० जानेवारीपर्यंत न्यायालयात सादर करावा असे निर्देश न्यायालयाने दिले आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व पक्षकारांनाही दिवाणी न्यायालयाने याबाबत नोटीस बजावली आहे. तसेच फिर्यादी विष्णू गुप्ता यांच्या अपिलावर कोर्टाने अमीन यांच्याकडून अहवाल मागविला आहे.

हेही वाचा: Crime News : मुंबई हादरली! लोअर परेलमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

श्रीकृष्ण जन्मभूमीशी संबंधित आणखी एका प्रकरणात, फिर्यादीचे वकील महेंद्र सिंह यांनी सांगितलं की, कोर्टाने अमीन यांना तीन दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. फिर्यादी विष्णू गुप्ता यांनी १३.३७ एकर जमीन मोकळी करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Mathura