बहिणीचे रक्षण करणाऱ्या भावाची गोळ्या घालून हत्या

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

रस्त्यावरून जाताना छेडछाड करणाऱ्या गुंडांपासून स्वत:च्या बहिणीचे रक्षण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भावाची गोळ्या घालून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मथूरा (उत्तर प्रदेश) : रस्त्यावरून जाताना छेडछाड करणाऱ्या गुंडांपासून स्वत:च्या बहिणीचे रक्षण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भावाची गोळ्या घालून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बुधवारी रात्री चंद्रशेखर नावाचा व्यक्ती आपल्या दोन बहिणींसोबत छटा गावातून दीग गावाकडे निघाला होता. त्यावेळी काही गुंडांनी त्यांना रस्त्यात अडवले. त्यांना लुटले आणि बहिणींचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी चंद्रशेखरने या प्रकाराला विरोध करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी गोवर्धन पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहिम सुरू आहे.

Web Title: Mathura : Man gunned down trying to protect sisters from goons