जाहिरातीत "बिग बीं'सह झळकलेल्या सिंहाचा मृत्यू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

अहमदाबाद- "बिग बी' अमिताभ बच्चन यांच्यासोबत "खुशबू गुजरात की...' या गुजरातच्या पर्यटन जाहिरातीत झळकलेल्या मौलाना या सिंहाचा बुधवारी (ता. 16) मृत्यू झाला.

अहमदाबाद- "बिग बी' अमिताभ बच्चन यांच्यासोबत "खुशबू गुजरात की...' या गुजरातच्या पर्यटन जाहिरातीत झळकलेल्या मौलाना या सिंहाचा बुधवारी (ता. 16) मृत्यू झाला.

मौलाना 16 वर्षांचा होता. गीरमधील तो सर्वांत वयोवृद्ध सिंह होता. अमिताभ यांच्यासोबतच्या जाहिरातीत मौलानासह 8 सिंह दिसले होते. 'मौलाना' हा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. गिर अभयारण्याची शान असलेल्या 'मौलाना'ला पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी 2010 साली आपल्या ब्लॉगमध्ये मौलानासह तेथील सिंहांचे वर्णन केले होते. 'सिंह, केवळ एक नाही तर अनेक. ते येत आहेत 3, 4... पूर्ण 7... त्यात त्यांचा म्होरक्यादेखील आहे. सोबतीला दोन सिंहिणी आणि बछडे. ते खूप शांततेत येत आहेत आणि तलावाच्या किनारी पाणी पीत आहेत. सर्वात वयस्कर सिंह एका कोप-यात बसला असून अन्य सिंह आताही पाणी पीत आहेत, आणि इकडे तिकडे उड्या मारत आहेत.' असे वर्णन अमिताभ बच्चन यांनी केले होते.

मौलानाच्या मृत्यूची घोषणा करताना मुख्य वनसंरक्षक ए. पी. सिंह म्हणाले, ""हा सिंह पर्यटकांसाठी राखीव असलेल्या क्षेत्रात कायम दर्शन देत असे. तो मौलानासारखा दिसत असल्याने त्याचे नानकरण मौलाना केले होते. गेल्या दहा दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते.''

Web Title: Maulana the lion in 'Khushboo Gujarat ki' dies of old age