यासिन मलिकच्या शिक्षेविरोधात होऊ शकतो मोठा दहशतवादी हल्ला; IB कडून अलर्ट

यासीन मलिक याला एनआयए कोर्टानं जन्मठेप आणि १० लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
Yasin Malik
Yasin Malikesakal

नवी दिल्ली : फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या (Yasin Malik) संदर्भात सुरक्षा यंत्रणांना मोठा अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या गुप्तचर विभागाने (Intelligence Department) हा अलर्ट जारी केला आहे. सुरक्षा एजन्सींच्या अधिका-यांच्या व्यतिरिक्त, दिल्ली पोलिसांना सुमारे 6 ते 7 संवेदनशील अलर्ट प्राप्त झाले आहेत. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या शिक्षेच्या निषेधार्थ दिल्ली एनसीआरमध्ये दहशतवादी हल्ले केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Intelligence Department Alert After Yasin Malik Result)

Yasin Malik
लोकसंख्या वाढल्यास हरकत नाही, परंतु कमी झाल्यास धोका : मस्क

गुप्तचर विभागाने दिलेल्या अलर्टनुसार, देशाची राजधानी आणि एनसीआर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असून, ज्या दिवशी यासिन मलिकला एनआयए कोर्टाने दोषी ठरवले होते. त्याच दिवसापासून दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट जारी केला असून, यासिन मलिकला दोषी ठरवल्याच्या निषेधार्थ त्याचे कट्टर समर्थक आणि त्याच्या जवळच्या दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांनी सीमेपलीकडून दहशतवादी हल्ल्याची योजना आखली आहे. दरम्यान, या अलर्टनंतर दिल्ली आणि एनसीआर परिसरातील नंबर प्लेट नसणाऱ्या तसेच संशयास्पद वाहनांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

Yasin Malik
इकडं यासिन मलिक दोषी तिकडं शाहिद आफ्रिदीच्या पोटात दुखलं

यासिन मलिकला जन्मठेप; NIA कोर्टानं सुनावली शिक्षा

टेरर फंडिंग प्रकरणी जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रन्टचा विभाजनवादी नेता यासीन मलिक याला एनआयए कोर्टानं जन्मठेप आणि १० लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष एनआयए न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी हा निकाल सुनावला. कोर्टानं त्याला यापूर्वीच या प्रकरणात दोषी ठरवलं होतं. याप्रकरणी आज सकाळी अंतिम सुनावणी झाली होती तेव्हा एनआयएनं मलिकच्या फाशीची मागणी कोर्टाकडं केली होती. या सुनावणीनंतर कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला होता. दरम्यान, मलिकला फाशीची शिक्षा होते की जन्मठेप याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com