काँग्रेसचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील 'हा' नेता होणार काँग्रेसअध्यक्ष?

वृत्तसंस्था
रविवार, 30 जून 2019

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नव्या काँग्रेस अध्यक्षपदाबाबत सुरू झालेली चर्चा आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. गांधी घराण्याकडून अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याची माहिती काँग्रेसच्या गोटातून देण्यात येत आहे. मात्र, अद्याप याबाबत घोषणा करण्यात आलेली नाही.

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नव्या काँग्रेस अध्यक्षपदाबाबत सुरू झालेली चर्चा आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. गांधी घराण्याकडून अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याची माहिती काँग्रेसच्या गोटातून देण्यात येत आहे. मात्र, अद्याप याबाबत घोषणा करण्यात आलेली नाही.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्याने नवा अध्यक्ष कोण होणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. पण आता सुशीलकुमार शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, काँग्रेसकडून मल्लिकार्जून खर्गे, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, अशोक गेहलोत सचिन पायलट आणि पृथ्वीराज चव्हाण यांचीही नावं काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. परंतु, सुशीलकुमार शिंदे यांचे नाव यामध्ये आघाडीवर सांगण्यात आले आहे. शिंदे आज (ता.30) राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता असून या भेटीत निर्णय होणार असल्याचे बोलेले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: may be sushil kumar-shinde readey is a new congress president