शंकराचार्यांवरही होऊ शकतो हल्ला - कैलाश सत्यर्थी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

नवी दिल्ली : देशात जमावाकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना वाढत असून ही चिंतेची बाब आहे. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी काही लोक मारहाणीच्या घटना घडवून आणतात. याचा राजकीय फायद्यासाठीही उपयोग केला जातो. मात्र, ही विचारसरणी चुकूची असून याने देशात दहशतीचे व नकारात्मक वातावरण तयार होते. देशात अशीच परिस्थिती राहिली तर शंकराचार्यांवरही जमावाचा हल्ला होऊ शकतो. असे स्पष्ट मत नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यर्थी यांनी व्यक केले. देशात सोशल मिडिया बरोबरच समाजाचा, राजकारण आणि धर्मकारणाचा दर्जा घसरत जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

आपल्या देशात वाद-विवाद, चर्चा यांना महत्त्व आहे. वादे-वादे जायते तत्त्वबोधः असे भारतीय वेदांमध्ये लिहून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे एख्याद्याला मारहाण करून ठार मारणे ही भारतीय संस्कृती नाही. मंडन मिश्र आणि शंकराचार्य यांच्यातही अशाच प्रकारे चर्चा झाली होती. मात्र सध्याचे देशातील वातावरण पाहता असा वाद-प्रतिवाद रंगलाच नसता. शंकराचार्यांना थेट मारहाणच झाली असती. असेही सत्यार्थी म्हणाले.

बलात्कार करणारे राक्षस असतात
मुलीवरील बलात्काराची घटना घडल्यावर ती कोणत्या धर्माची आहे, हे पाहून आवाज उठवला जातो. मुस्लिम हिंदूसाठी आणि हिंदू मुस्लिमांसाठी आवाज उठवत नाही. परंतु, हिंदू किंवा मुस्लिम बांधवांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ती म्हणजे, बलात्कार करणारा हिंदू किंवा मुस्लिम नसतो तो राक्षस, नराधम असतो.

Web Title: may happen mob lynching on shankaracharya - Kailash Satyarthi