मायावतींचा उमेदवार जिंकला; आठवलेंच्या पक्षाला फक्‍त 1500 मते! 

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 मे 2018

पुणे: मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने कर्नाटकात खाते उघडले आहे. कोलेगल विधानसभा मतदारसंघात बसपाच्या एन. महेश यांनी विजय मिळवला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रिय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआयने ही जागा लढवली होती. 

या निवडणुकीत बसपाने देवेगौडांच्या जेडीएसबरोबर युती केली आहे. बसपा उमेदवारांच्या प्रचारासाठी मायावतींनी सभाही घेतल्या होत्या. कोलेगल मतदारसंघात एन. महेश हे बसपाचे प्रदेशाध्यक्ष उभे होते.

त्यांच्याविरुद्ध आरपीआयने चिक्‍कासावका एस. यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या प्रचारासाठी स्वत: आठवले आले होते. आरपीआयचा उमेदवार जिंकला तर भाजपला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले होते.

प्रत्यक्षात आरपीआय उमेदवाराला दीड हजार मते मिळाली आहे. बसपा उमेदवाराने 70 हजाराहून अधिक मते घेत विजय मिळवला आहे. दुसऱ्या क्रमांकावर भाजपचा उमेदवार राहिला आहे.

Web Title: Mayavati wins one seat in Karnataka