सप-बसप युती म्हणजे स्वार्थाचा सौदा - भाजप

वृत्तसंस्था
सोमवार, 5 मार्च 2018

समाजवादी पक्षाची युतीची शक्‍यता "बसप'च्या अध्यक्षा मायावती यांनी काल फेटाळली असली तरी भाजपला पराभूत करण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांना आपले कार्यकर्ते पाठिंबा देतील, अशी घोषणा त्यांनी केली होती

लखनौ - "उत्तर प्रदेशमधील गोरखपूर व फुलपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्यातील युती म्हणजे "स्वार्थासाठीचा सौदा' आहे. लोकांनी या दोन्ही पक्षांना धुडकावल्याने आलेल्या नैराश्‍येतून ही युती झाली आहे,' अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने व्यक्त केली.

समाजवादी पक्षाची युतीची शक्‍यता "बसप'च्या अध्यक्षा मायावती यांनी काल फेटाळली असली तरी भाजपला पराभूत करण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांना आपले कार्यकर्ते पाठिंबा देतील, अशी घोषणा त्यांनी केली होती. गोरखपूर आणि फूलपूरमधील "बसप'च्या स्थानिक नेत्यांनीही "सप'च्या उमेदवारांना पाठिंबा दर्शविला आहे. 

Web Title: mayawati bjp uttar pradesh election