मायावती म्हणाल्या, मुस्लिम गद्दार : सिद्दीकींचा दावा

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 मे 2017

मुस्लिमांबद्दल त्यांनी माझ्यासमोर अपशब्द उच्चारले होते. मी याविरोधात आवाज उठविल्यानंतर माझी पक्षातून काढण्यात आले. मुस्लिम नागरिकांनी बसपला मते का दिली नाहीत, असे मायावतींनी मला विचारले असता मुस्लिमांची मते सप आणि काँग्रेसमध्ये विभागली गेल्याचे उत्तर मी दिले. त्यावर त्यांनी मुस्लिम नागरिक गद्दार असल्याचे म्हटले.

लखनौ - बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी मुस्लिम नागरिकांबद्दल अपशब्द उच्चारताना त्यांना गद्दार असे संबोधल्याचे बसपमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी म्हटले आहे. 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर बहुजन समाज पक्षाने (बसप) महासचिव नसीमुद्दीन सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा अफजल यांची पक्षातून हकालपट्टी केली. यानंतर आज (गुरुवार) यांनी पत्रकार परिषद घेत मायावती यांच्यावर आरोप केले आहेत.

सिद्दीकी म्हणाले, की मायावती यांनी माझ्यावर खोटे आरोप करत माझी पक्षातून हकालपट्टी केली. मुस्लिमांबद्दल त्यांनी माझ्यासमोर अपशब्द उच्चारले होते. मी याविरोधात आवाज उठविल्यानंतर माझी पक्षातून काढण्यात आले. मुस्लिम नागरिकांनी बसपला मते का दिली नाहीत, असे मायावतींनी मला विचारले असता मुस्लिमांची मते सप आणि काँग्रेसमध्ये विभागली गेल्याचे उत्तर मी दिले. त्यावर त्यांनी मुस्लिम नागरिक गद्दार असल्याचे म्हटले. याचा विरोध मी केल्यानंतर मला आणि माझ्या मुलाला पक्षातून काढून टाकण्यात आले. बसपची अवस्था खराब होण्यास राज्यसभेचे खासदार सतीश चंद्र मिश्रा यांचा मोठा वाटा आहे. मायावतींनी माझ्याकडे 50 कोटी रुपयांची मागणी केली होती.

Web Title: Mayawati called Muslims traitors for not voting for Bsp: Naseemuddin Siddiqui