चाळीस जागांशिवाय महाआघाडी नाही - मायावती
एकजुट होण्यापुर्वीच तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बहूजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी लोकसभा निवडणूकीत 40 जागा लढविण्याची मागणी केल्याने सर्वांच्यात भुवया उंचावल्या आहेत. कैराना आणि नुरपूर मधील विजयानंतर समाजवादी पक्षांनी प्रचंड जल्लोष केला होता. परंतु, मायावतींच्या भूमीकेमुळे याला खीळ बसण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात समाजवादी पक्षाच्या बैठकीत मायावती यांनी सन्मानपुर्वक जागा मिळाल्या तरच आघाडी होईल असे स्पष्ट केले होते.
लखनऊ : उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीत भाजपला सर्व विरोधी पक्षांनी मिळून धूळ चारली. यामध्ये सर्वात मोठा वाटा बहुजन समाजवादी पक्षाचा होता. या मतदारसंघात दलित मतांचा टक्का अधिक आहे. या विजयानंतर 2019 च्या लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन भाजपला हरविण्यासाठी विरोधकांची एकजूट सुरू आहे. परंतु, ही एकजुट होण्यापुर्वीच तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बहूजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी लोकसभा निवडणूकीत 40 जागा लढविण्याची मागणी केल्याने सर्वांच्यात भुवया उंचावल्या आहेत. कैराना आणि नुरपूर मधील विजयानंतर समाजवादी पक्षांनी प्रचंड जल्लोष केला होता. परंतु, मायावतींच्या भूमीकेमुळे याला खीळ बसण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात समाजवादी पक्षाच्या बैठकीत मायावती यांनी सन्मानपुर्वक जागा मिळाल्या तरच आघाडी होईल असे स्पष्ट केले होते.
पोटनिवडणूकीत दलित मतांचे महत्व अधिक
उत्तर प्रदेशात झालेल्या कैराना आणि नुरपूर मतदारसंघात भाजपला रोखण्यात दलित समाजाचा मोठा वाटा आहे. याचा अंदाज घेऊनच मायावती यांनी 40 जागांची मागणी केल्याचे बोलले जात आहे. राज्यात लोकसभेच्या एकूण 80 जागा आहेत. त्यामुळे अधिक जागा लढविण्याचे सुतोवाच पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मायावतींनी आधीच देण्यात आले होते.
जागा वाटपांचा अंदाज
ज्या मतदारसंघात 2014 च्या लोकसभा निवडणूकीत समाजवादी पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता, तिथे 2019च्या निवडणूकीत बहूजन समाज पक्षाला उमेदवारी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार समाजवादी पक्षाला 31 जागा जात आहेत. तर मायावतींच्या पक्षाला 34 जागा मिळत आहेत. अशात मायावतींची 40 जागांची मागणी महाआघाडीसाठी मोठी समस्या होऊ शकते.