भाजपनियुक्त राज्यपालांनी राजीनामा द्यावा : मायावती

वृत्तसंस्था
शनिवार, 19 मे 2018

देशातील भाजपनियुक्त राज्यपालांना दबावाखाली ठेवण्याचे काम केले जात आहे. सध्या भाजपने जी प्रतिमा निर्माण केली ती आता मलीन होत आहे. त्यामुळे अशा लोकांनी राजीनामा द्यायला हवा, असे टीकास्त्र बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी भाजपवर सोडले. 

नवी दिल्ली : देशातील भाजपनियुक्त राज्यपालांना दबावाखाली ठेवण्याचे काम केले जात आहे. सध्या भाजपने जी प्रतिमा निर्माण केली ती आता मलीन होत आहे. त्यामुळे अशा लोकांनी राजीनामा द्यायला हवा, असे टीकास्त्र बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी भाजपवर सोडले. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर मायावती यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली. मायावती म्हणाल्या, कर्नाटकात भाजपला सडेतोड उत्तर देण्यात आले. याचबरोबर मी सर्वोच्च न्यायालयाचे धन्यवाद देते. लोकशाहीला कमकुवत होऊ दिले नाही. अमित शहा, नरेंद्र मोदींच्या कारस्थानामुळे हे झाले. यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला. देशातील राज्यपालांना दबावाखाली ठेवण्यात येत आहे. भाजपने जी प्रतिमा निर्माण केली ती आता मलीन होत आहे. अशा लोकांनी राजीनामा द्यायला हवा. 

भाजपच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींवर बोलताना मायावती म्हणाल्या, नेहमीच ते यशस्वी होणार असे नाहीत. मणिपूर, गोव्यात ते यशस्वी झाले. मात्र, आता ते यशस्वी होणार नाहीत. त्यांनी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला. सर्वोच्च न्यायालयाने निपक्षपातीपणे निर्णय घेतला. न्यायालयाने जी पावले उचलली त्याबद्दल न्यायालयाचे धन्यवाद देणे गरजेचे आहे.

Web Title: Mayawati demanded resignation by BJP ruled governors