ईडीच्या भीतीने मायावती आघाडीपासून दूर

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा गौप्यस्फोट
Congress leader Rahul Gandhi
Congress leader Rahul Gandhiesakal

नवी  दिल्ली : उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेससोबत आघाडी व्हावी म्हणून बसपच्या प्रमुख मायावती यांना प्रस्ताव दिला होता. एवढेच नाही तर त्यांनी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रिही व्हावे या मताचे आम्ही होतो. परंतु केंद्र सरकार पाठीमागे सीबीआय, ईडी लावेल किंवा पेगाससची भीती दाखवेल यामुळे त्यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचा गौप्यस्फोट कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला.

नवी दिल्ली येथील जवाहर भवन येथे के.  राजू  यांच्या  ‘दलित  ट्रूथ’  या  पुस्तकाच्या  प्रकाशनाच्या वेळी  राहुल  गांधी  बोलत  होते.  या कार्यक्रमाला देशभरातील काँग्रेसचे नेते उपस्थित होते. राहुल गांधी  म्हणाले,  उत्तर प्रदेश  निवडणुकीच्या वेळी    मायावतींना  आघाडीसाठी  प्रस्ताव  दिला  होता.  परंतु भाजप आणि केंद्र सरकारच्या भीतीमुळे त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला नाही. यामुळे मुख्यमंत्री होण्याची संधी मायावतींनी गमावली. त्यांनी रक्त आटवून अथक परिश्रमाने बहुजन समाज पक्ष मजबूत केला. परंतु दुर्दैव असे आहे की, त्यांना निवडणूकही लढता येत नाही.

मी  कुठलाही गैरव्यवहार  केला नाही, त्यामुळेच आज  तुमच्या पुढे  भाषण  करताना  ताठ मानेने उभा आहे. मी सतत देशाच्या प्रगतीचा विचार करीत आलो आहे. माझा जन्म सत्तेच्या घरात झाला. परंतु मला सत्तेचा मोह अजिबात नाही. तर दुसरीकडे लोक कायम सत्ता कशी मिळवायची यापलिकडचा विचारच करू शकत नाही, असेही ते म्हणाले.

दलितांना काँग्रेसनेच न्याय दिला

राज्यघटना  तयार  करण्यात  डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांचे खूप मोठे योगदान  आहे.  परंतु  देशातील ही संस्था  खिळखिळी करण्यात येत असल्याचे दिसून येते. असे  झाल्यास  राज्यघटनेला  काहीही  अर्थ  उरणार नाही. देशातील  संस्था  प्रबळ  राहिल्या  तरच  लोकशाहीतील  बहुमताला  महत्त्व  राहील. दलित समुदायाला काँग्रेसनेच न्याय दिला आहे. त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, हे सांगताना राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष सध्या द्वेषाचे राजकारण करीत असल्याची टीका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com