'स्वतःचं स्वप्न पूर्ण न करणारे...', मायावतींचा अखिलेश यादवांवर पलटवार

Mayawati on Akhilesh Yadav
Mayawati on Akhilesh Yadave sakal

लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. जे मुख्यमंत्री होण्याचं स्वतःचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही. ते दुसऱ्याचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न कसं पूर्ण करणार? असा सवाल मायावतींनी उपस्थित केला. (Mayawati on Akhilesh Yadav)

Mayawati on Akhilesh Yadav
भाजपकडून राष्ट्रपतीपदाची ऑफर? मायावती यांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाल्या..

गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत युतीत लढलेल्या बसपा आणि समाजवादी पक्षाच्या प्रमुखांमध्ये सध्या शाब्दीक वार सुरू आहे. बसपाने उत्तर प्रदेश निवडणुकीत आपली मतं ही भाजपला हस्तांतरीत केली आहेत. आता भाजप मायावतींना राष्ट्रपती करते की नाही? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे, असं अखिलेश यादव म्हणाले होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका-टीप्पणी करण्यास सुरुवात केली.

अखिलेश यादव यांच्या वक्तव्यानंतर मायावतींनी पलटवार केला. मी उत्तर प्रदेशची मुख्यमंत्री बनण्याचे आणि भविष्यात पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू शकते. पण, मी राष्ट्रपती कधीही होणार नाही, असं मायावती म्हणाल्या होत्या. त्यानंतर अखिलेश यांनी मायातींना प्रत्युत्तर देत आम्हाला देखील हेच हवे होते. त्यामुळे आम्ही २०१९ मध्ये तुमच्यासोबत युती केली होती, असं म्हटलं. युती कायम असती तर कोण पंतप्रधान झालं असतं हे देशाला दिसलं असतं, असंही अखिलेश म्हणाले.

अखिलेश यादव आणि मायावतींमध्ये ट्विटर वॉर सुरूच आहे. "जेव्हा समाजवादी पक्षाचे प्रमुख मुस्लिम आणि यादव समाजाची पूर्ण मते घेऊन आणि अनेक पक्षांशी युती करून उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत, तर ते दुसऱ्यांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न कसं काय पूर्ण करू शकतात?'' असं ट्विट मायावतींनी केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com