Loksabha 2019: मायवतींनी लग्न करावं- आठवले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 मे 2019

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. मात्र मायावतींनी लग्न केले नाही त्यामुळे कुटुंब काय असते त्यांना ठाऊक नाही. त्यांनी लग्न करावे मग त्यांना घर, कुटुंब कसे सांभाळले जाते याची जाणीव होईल असं रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

भेलुपूर (उत्तरप्रदेश): बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. मात्र मायावतींनी लग्न केले नाही त्यामुळे कुटुंब काय असते त्यांना ठाऊक नाही. त्यांनी लग्न करावे मग त्यांना घर, कुटुंब कसे सांभाळले जाते याची जाणीव होईल असं रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

मायावतींनी लग्न केले तर त्या मोदींबाबत बोलू शकतात असंही आठवले यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातील भेलुपूर या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली. राजकीय फायद्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच्या पत्नीला सोडलं, ते महिलांचा सन्मान कसा करणार? असा प्रश्न विचारत मायावतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती.

मोदींवर केलेल्या टीकेला रामदास आठवले यांनी उत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लग्न झालं आहे. त्यांची पत्नी शिक्षिका आहे. मायावतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यक्तीगत टीका करायला नको होती असंही आठवले यांनी म्हटलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayawati Is Not Married She Doesnt Know What A Family Is Says Ramdas Athawale