मायावती दलितांच्या नावाने पैसे गोळा करतात: भाजप

वृत्तसंस्था
बुधवार, 7 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - "बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती या दलित आणि आंबेडकरांच्या नावावर पैसे गोळा करत आहेत', अशा शब्दांत मोदींना लक्ष्य करणाऱ्या मायावतींना भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.

नवी दिल्ली - "बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती या दलित आणि आंबेडकरांच्या नावावर पैसे गोळा करत आहेत', अशा शब्दांत मोदींना लक्ष्य करणाऱ्या मायावतींना भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुकूमशाही पद्धतीने नोटाबंदीचा निर्णय लादला असून, मोदी यांनी संपूर्ण देशाला फकीर केले आहे, अशी टीका मायावती यांनी केली होती. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा वृत्तंसस्थेशी बोलताना म्हणाले, "बेहजनींनी दलित आणि आंबेडकरांच्या नावाने राजकारण केले आहे. त्यांच्यासाठी काहीही केलेले नाही. ज्या कॉंग्रेसने आंबेडकरांचा अवमान केला त्या कॉंग्रेसला त्या पाठिंबा देतात. तर भारतीय जनता पक्षाने आंबेडकरांशी संबंधित "पंचतीर्थ'ची निर्मिती केली. बेहजनींना आंबेडकरांच्या नावाने काहीही करण्याचा अधिकार नाही. त्या केवळ दलितांच्या नावावर नोटा गोळा करतात.' मायावती यांच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशमध्ये 1 हजार 100 दलितांची हत्या झाली. तर 30 हजार पेक्षश अधिक ऍट्रासिटीचे गुन्हे दाखल झाले असल्याचेही शर्मा यांनी यावेळी सांगितले.

तसेच भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून सरकार स्थापन करेल, असा विश्‍वासही शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला. नोटाबंदीच्या निर्णयाबाबत बोलताना शर्मा यांनी हा भ्रष्टाचाराच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Mayawati only collecting currency in Dalits’ name: BJP