उ.प्रदेश पोटनिवडणुकीत बसपचा सपला पाठिंबा नाही

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 मार्च 2018

राज्यात नुकत्याच झालेल्या गोरखपूर व फुलपूर मतदारसंघांमधील निवडणुकीसाठी झालेल्या बसप व सप युतीने भारतीय जनता पक्षाचा (भाजप) पराभव केला होता. मात्र आता होणाऱ्या कैराणा (लोकसभा) व नूरपूर (विधानसभा) निवडणुकीसाठी सपला बसपचा पाठिंबा मिळणार नाही

लखनौ - उत्तर प्रदेशात लवकरच होणाऱ्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाला (सप) पाठिंबा देणार नसल्याचे बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी स्पष्ट केले आहे. बसपचा

हा निर्णय सपसाठी धक्कादायक मानला जात आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या गोरखपूर व फुलपूर मतदारसंघांमधील निवडणुकीसाठी झालेल्या बसप व सप युतीने भारतीय जनता पक्षाचा (भाजप) पराभव केला होता. मात्र आता होणाऱ्या कैराणा (लोकसभा) व नूरपूर (विधानसभा) निवडणुकीसाठी सपला बसपचा पाठिंबा मिळणार नाही.

राज्यसभेसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये बसपला सपचा पाठिंबा मिळूनही पराभव स्वीकारावा लागला होता. या पार्श्‍वभूमीवर मायावती यांनी सपला या निवडणुकीत मदत न करण्याचा निर्णय घेतला आहे. या पराभवाबद्दल बोलताना मायावती यांनी सप प्रमुख अखिलेश यादव यांनी राजकीय प्रगल्भता न दाखविल्याची टीकाही केली होती.

Web Title: Mayawati won’t support SP in UP bypolls