2 हजारांच्या नोटेपेक्षा भावला बँक मॅनेजर

मयूर गलांडे, हैदराबाद
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

घरापासून दूरदूर म्हणजे हैदराबादला राहत असल्याने नोटा बंदीच्या निर्णयाचा उलीसा फटका आपल्याला बसला.

घरभाडे आणि किरकोळ खर्चासाठी 6 हजार रुपये काढले होते. 500 च्या नोटांनी खिसा भरल्यामुळे 2 इंच छातीपण फुगली होती. मात्र, मोबाईलचे नेट बंद असल्याने रुममेट घरी आल्यानंतरच नोटा बंदीची बातमी रात्री 11 वाजता कळली. पहिलं तर विश्वास बसला नाही, पण नंतर सत्यता पडताळल्यावर पार हवाच निघून गेली. जवळ चिल्लर नसल्याने खाय-पेयचे वांदे झाले. 

घरापासून दूरदूर म्हणजे हैदराबादला राहत असल्याने नोटा बंदीच्या निर्णयाचा उलीसा फटका आपल्याला बसला.

घरभाडे आणि किरकोळ खर्चासाठी 6 हजार रुपये काढले होते. 500 च्या नोटांनी खिसा भरल्यामुळे 2 इंच छातीपण फुगली होती. मात्र, मोबाईलचे नेट बंद असल्याने रुममेट घरी आल्यानंतरच नोटा बंदीची बातमी रात्री 11 वाजता कळली. पहिलं तर विश्वास बसला नाही, पण नंतर सत्यता पडताळल्यावर पार हवाच निघून गेली. जवळ चिल्लर नसल्याने खाय-पेयचे वांदे झाले. 

एक दिवस कसाबसा मित्रांच्या जीवावर काढला. नोटा बदलीची माहिती घेऊन शेवटी तिसऱ्या दिवशी ज्युबिली हिल्स शाखेतील आयसीआयसीआय बँकेत दुपारी 4 वाजता पोहोचलो. बँक आणि रांग हे समीकरण ठरलेलंच तर एटीएम बाहेरही भलीमोठी रांग. बँकेत गेल्यावर कॅश डिपॉझिट फॉर्म घेऊन त्यावर 6 हजार रुपयांची रक्कम टाकली अन् रांगेत उभारलो. आपण मराठी त्यामुळे एकतर हिंदी नायतर मोडक-तोडक इंग्रजी बोलाव लागायचं. तेलुगू अद्यापही येत नाही. त्यामुळे कशीतरी संवादाची जुळवाजुळव करत रांगेतील नोटा बंदीवर चर्चा करणाऱ्या तज्ञांशी बोलत होतो. एकीकडे डिपॉझीट कॅश तर दुसरीकडे विथड्रॉ कॅश काऊंटर होते. मी डिपॉझिट कॅश काऊंटरवर होतो. तितक्यात मोठ्याने आवाज करणाऱ्या बँक खातेदाराकडे माझे लक्ष गेले. एक अतिशहाणा सरकारला शिव्या घालत बँकेच्या मॅनेजरशी हुज्जत घालत होता. मात्र, बँक मॅनेजर शांतपणे त्याला समाजावून सांगत होते, निर्णयाचे समर्थन करुन ते पटवून देत होते. मग, मी त्या मॅनेजरकडेच बघत राहिलो. 

मॅनेजरची केबीन रिकामी होती. हा ब्रँच मॅनेजरसारखे इकडे-तिकडे फिरत होता, तर कॅश काऊंटरवरच उभा राहत होता. प्रत्येक ग्राहकाला आदबीने विचारपूस करत होता. तर वयस्कर आणि वृद्धांनाही तितक्याच आदराने माहिती देत होता. कधीकधी ग्राहकाच्या पॅनकार्डची झेरॉक्स काढायलाही स्वत: जात होता. म्हणजे बँकेने शाखेतच झेरॉक्स मशिन ठेवली होती व ग्राहकांना तिथेच मोफत झेरॉक्सही मिळत होती. त्या ब्रँच मॅनेजरचे मॉनीटरींग, सेवा आणि हसरा खेळता चेहरा मला खूपच भावला. त्या मॅनेजरच्या सेवाधार्जिनी स्वभावाने क्षणातच माझे लक्ष वेधून घेतले. माझा नंबर आल्यानंतर मी कॅश डिपॉझीट केली अन् लगेचच विथड्रॉ फॉर्म मागितला. मात्र, तेथील may i help U म्हणणाऱ्या मॅडमने मला फॉर्म देण्यास नकार दिला. तुमची ब्रँच वेगळी असल्याचे त्या म्हणाल्या. मी त्यांना हिंदीत समजावून सांगत होतो, पण त्यांना हिंदी कळत नव्हते, अन् त्यांनी काही ऐकलेही नाही. त्यामुळे मी थेट ब्रँच मॅनेजरकडे गेलो, त्यांना अडचण सांगितली. मै महाराष्ट्र से हूँ, परेशानी है.. असे सांगतानाच त्यांनी एक हलकेसे स्माईल दिले अन् म्हणाले गो अहेड. त्यानंतर लगेचच त्या मॅडमने मला विथड्रॉ फॉर्म देत माझी हेल्प केली. मीही आनंदी होऊन मस्त 6 हजार रुपये कॅश काऊंटरवरुन घेतले. त्यानंतर मॅनेजरकडे गेलो. त्यावेळीही एका ग्राहकास ते काहीतरी समजावून सांगत होते. मी त्यांना थँक्स म्हणत त्यांच्या हातात हात दिला. त्यानंतर त्यांना म्हटले, यदी आपके जैसा ब्रँच मॅनेजर हर ब्रँच मे हो तो कंज्युमर को कोई तकलीफ नही होगी. त्याने कमरेत अर्धे वाकून छातीवर हात ठेवत मला स्माईल दिले. 'आखीर हम आपकी सेवा के लिए ही तो है..........

असे म्हणत मॅनेजरने पुन्हा हातात हात दिला. मीही हलकीशी स्माईल देत बँकेतून बाहेर पडलो आणि 2 हजारांच्या गुलाबी नोटेचे निरीक्षण करू लागलो. पण, त्या नोटेपेक्षा मला तो मॅनेजरच अधिक भावला. शेवटी हेच की, त्या मॅनेजरसारखं आपण सेवा पुरवत आहोत, हे जर प्रत्येक बँक कर्मचाऱ्यांस आणि बँक मॅनेजरला समजले तर कुणालाही त्रास होणार नाही हे मात्र खरयं.

Web Title: Mayur Galande write about 2000 rupee notes