गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी माझा बाप्पा एॅप  

गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी माझा बाप्पा एॅप  

बेळगाव : बेळगावच्या शहरातील गणेशोत्सवाला मोठी परंपरा असून शहरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने गणेश भक्‍त येत असतात मात्र अनेकांना कोणत्या मंडळाने कोणता देखावा सादर केला आहे किंवा मंडळाची मुर्ती कशी आहे कोणते मंडळ कोणत्या गल्लीत आहे याची माहिती नसते त्यामुळे अनेक गणेश भक्‍ताना शोधाशोध करावी लागते परंतु यापुढे आपल्याला घर बसल्या माझा बाप्पा या ऍपचा वापर करुन सर्व माहिती काही क्षणात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बाप्पा ऍप गणेश भक्‍तांसाठी एक पर्वनी ठरणार आहे. 

बेळगाव शहरात 370 हुन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत तसेच लाखो लोक घरात गणरायाची प्रतिष्ठापणा करतात याबाबतची सर्व माहिती माझा बाप्पा या ऍपचा वापर करुन मिळणार आहे यासाठी विजयनगर येथील व सध्या बेंगळुर येथे नोकरी करीत असलेल्या श्रेयस श्रीकांत पाटील या सॉफ्टवेअर इंजिनियरने स्वतची नोकरी सांभाळित अतिशय सुंदर असे ऍप बनविले आहे. मोबाईलमधील प्ले स्टोअरचा वापर करुन हे ऍप अपलोड करता येणार आहे. माझा ऍप डाऊनलोड करुन झाल्यांनतर आपल्याला युजर आयडी व पासवर्ड मिळणार आहे ऍप डाऊनलोड केल्यानंतर घरातील गणरायाचे सहा फोटो तर मंडळे 21 फोटो टाकु शकतात.

ऍपवर चांगल्या मंडळाना मतदान करण्याची सोयही उपलब्ध करुन देण्यात आली आहे विसर्जनला चार पाच शिल्लक असताना शहरातील सर्वोत्कृष्ट मंडळानी मतदान करता येणार आहे जास्त मतदान होणाऱ्या तीन मंडळाना तर घरगुती स्वरुपातील ज्या मुर्तींना ऍपवर अधिक लाईक्‍स मिळतील त्यामधील 3 जणांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. ऍपच्या उदघाटनचा कार्यक्रम सोमवार (ता. 10) रोजी होणार आहे तरीही आतापासुनच अनेकजण ऍप डाऊनलोड घेत आहेत. 

पुढील प्रमाणे माझा बाप्पा ऍप डाउनलोड करुन घेऊ शकता 
1. प्ले स्टोअरवर जावुन माझा बाप्पा ऍप डाऊनलोड करा 
2. ऍप मंडळासाठी की वैयक्‍तिकसाठी पाहीजे ते सिलेक्‍ट करा 
3. तुमचा मोबाईल क्रमांक समाविष्ट करा त्यांनतर ओटीपी क्रमांक येईल तो समाविष्ट करा 
4. त्यानंतर तुमचे नाव, गल्ली व इमेल आयडी समाविष्ट करा 

मंडळानी ऍपवर आपली माहिती देण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्याचा किंवा कार्यकर्त्याचा क्रमांक देने गरजेचे असून मंडळाने, आपली माहिती दिल्यानंतर ऍप वापरण्यासाठी त्यांना युजर आयडी व पासवर्ड दिला जाणार आहे त्याचा वापर करुन मंडळ आपले फोटो व कार्यक्रमांची माहिती ऍपवर डाऊनलोड करु शकणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com