महाराष्ट्रातील या दहा अधिकाऱ्यांना पदके; पहा कोण आहेत ते अधिकारी

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 13 August 2020

उत्कृष्ट तपासकार्यासाठी गृहमंत्र्यांतर्फे दिल्या जाणाऱ्या पोलिस पदकासाठी यंदा देशभरातील १२१ पोलिस अधिकाऱ्यांची निवड झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. २०१८मध्ये या पुरस्कारांची सुरुवात झाली होती.

नवी दिल्ली - उत्कृष्ट तपासकार्यासाठी गृहमंत्र्यांतर्फे दिल्या जाणाऱ्या पोलिस पदकासाठी यंदा देशभरातील १२१ पोलिस अधिकाऱ्यांची निवड झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. २०१८ मध्ये या पुरस्कारांची सुरुवात झाली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुरस्कार विजेत्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये १० अधिकारी सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभाग), महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील प्रत्येकी दहा अधिकारी, तसेच ८ अधिकारी उत्तरप्रदेशातील आहेत. या व्यतिरिक्त केरळ आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी सात पोलिस अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. तर तब्बल २१ महिला पोलिस अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट तपासासाठीचे पदक पटकावले आहे.

तिरंगा फडकवण्याचे नियम तुम्हाला माहिती आहेत का? 

पदक विजेते अधिकारी 
१. शिवाजी पंडितराव पवार, पोलिस उपायुक्त
२. राजेंद्र सिद्राम बोकाडे, निरीक्षक
३. उत्तम दत्तात्रेय सोनवणे, निरीक्षक
४. नरेंद्र कृष्णराव हिवरे, वरिष्ठ निरीक्षक
५. ज्योती लक्ष्मण क्षीरसागर, अधीक्षक
६. अनिल तुकाराम घेर्डीकर, अपर अधीक्षक (एसडीपीओ)
७. नारायण देवदास श्रीगावकर, उपअधीक्षक
८. समीर नजीर शेख, उपायुक्त
९. किसन भगवान गवळी, उपायुक्त
१०. कोंडिराम रघू पोपेरे, निरीक्षक

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medals to these ten officers from Maharashtra