NEET परीक्षेसाठी विद्यार्थिनीला काढायला लावले अंतर्वस्त्र !

वृत्तसंस्था
सोमवार, 8 मे 2017

चेन्नई : राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश परीक्षा 'नीट' देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीला अंतर्वस्त्र काढण्यास सांगितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही परीक्षा देणाऱ्या एका तमीळ विद्यार्थिनीने हा धक्कादायक प्रकार घडल्याचे सांगितले. 

शासकीय किंवा खाजगी महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना NEET परीक्षा द्यावी लागते. येथील रविवारी झालेल्या परीक्षेवेळी पूर्ण बाह्यांचे शर्ट घातलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात जाण्यास मनाई करण्यात आली होती. 

यावेळी ही परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थिनींना विचित्र अनुभव आले. गेटवर एका टॉर्चच्या मदतीने प्रत्येक विद्यार्थ्याला तपासण्यात येत होते. कानांमध्येही टॉर्च मारून पाहण्यात येत होते. धातूच्या वस्तू, मोठी बटनं, उंच टाचांच्या चपला, मौल्यवान, जड अलंकार घालण्यास परीक्षा हॉलमध्ये मनाई करण्यात आली होती. 
जीन्सची पँट घातलेल्या एका परीक्षार्थीला धातूनची बटनं काढून टाकायला लावली, असे सूत्रांनी सांगितले. अशा प्रकारांमुळे विद्यार्थी व पालकांनी संताप व्यक्त केला. 
 
Web Title: medical aspirant girl asked to remove bra for NEET

टॅग्स