आता जिल्हा रुग्णालयांची होणार वैद्यकीय महाविद्यालये

Doctor
Doctor

नवी दिल्ली : आरोग्य क्षेत्रात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, म्हणून आरोग्य मंत्रालयानेच पुढाकार घेतला असून, याअन्वये देशभरातील 75 रुग्णालयांचे रूपांतर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केले जाणार आहे. जिल्हा रुग्णालयांमध्ये सोयीसुविधा वाढवून त्यांचे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रूपांतर करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. हा प्रस्तावदेखील त्याच केंद्रीय योजनेचा भाग असून, याचा देशातील मागास जिल्ह्यांना लाभ होऊ शकतो. 

या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये केंद्र सरकारने 58 जिल्हा रूग्णालयांचे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रूपांतर करण्यास परवानगी दिली असून, दुसऱ्या टप्प्यामध्ये आणखी 24 रुग्णालयांची निवड करण्यात आली. यापैकी 39 रुग्णालये कार्यरत झाली असून अन्य रुग्णालयांच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये 75 जिल्हा रुग्णालयांचे रूपांतर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये करण्याचा विचार असून, या योजनेचा प्रस्ताव मान्यतेसाठी वित्तीय खर्च समितीकडे पाठविला जाणार असून त्यानंतर तो मान्यतेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भातील कॅबिनेट नोटदेखील तयार करण्यात आली आहे. 

वचन पूर्ण होणार 
देशभरातील 75 जिल्हा रुग्णालयांचे रूपांतर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये करण्यासाठी 325 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ही योजना प्रत्यक्षात आल्यास भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील एक वचन पूर्ण होईल. दरम्यान, जिल्हा रुग्णालयांचे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रूपांतर करण्यासाठी त्या भागामध्ये कोणतेही खासगी अथवा सरकारी वैद्यकीय महाविद्यालय असता कामा नये, अशी अट घालण्यात आली आहे. 

यामुळे काय होणार 
वैद्यकीय क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ वाढणार 
ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा दर्जा सुधारणार 
जिल्ह्यांत आधुनिक सुविधा पोचविणे शक्‍य 

जागांची निर्मिती 
नव्या महाविद्यालयांमुळे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी दहा हजार अतिरिक्त जागा निर्माण होणार असून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या आठ हजार जागा निर्माण होतील. यामुळे सरकारी आणि खासगी क्षेत्रातील मनुष्यबळाची दरी भरून निघणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार हजार लोकांमध्ये एक डॉक्‍टर असणे बंधनकारक आहे; पण भारतामध्ये हे प्रमाण 1 हजार 953 जणांमागे एक डॉक्‍टर असे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com