पुरूष आणि महिलांची वैद्यकीय चाचणी एकाच ठिकाणी

वृत्तसंस्था
बुधवार, 2 मे 2018

भिंड : येथील जिल्हा रुग्णालयात पोलिस कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी आलेल्या पुरूष आणि महिलांची वैद्यकीय चाचणी एकाच खोलीत होत असून, महिलांची चाचणी पुरूष डॉक्टर करत असल्याची घटना समोर आली आहे. 

महिला उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी रुग्णालयात एकाही महिला डॉक्टरची व्यवस्था करण्यात आली नाही. एकमेकांसमोर होणाऱ्या या तपासणीमुळे महिला उमेदवार अस्वस्थ होत आहेत. या तपासणीसाठी एका परूष उमेदवाराला महिलांसमोर अर्धनग्न व्हावे लागल्याने तेही प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. चाचणी दरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने ही माहिती माध्यमांपर्यंतपोहचून घटना उघडकीस आली. 

वैद्यकीय तपासणी दरम्यान उमेदवारांच्या जाती त्यांच्या छातीवर लिहिल्या गेल्याचेही घटना घडली आहे. मात्र, एवढे होऊनही अजूनपर्यंत कोणतीही कारवाई प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.

Web Title: Medical exam of men & women conducted in same room