मेरठमध्ये 100 वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

जानी गावात ही महिला आपल्या भावासोबत राहत होती. सोमवारी दारुच्या नशेत असलेल्या अंकित पुनिया याने या महिलेवर बलात्कार केला. महिलेचा रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर तिच्या भावाने व गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

मेरठ - उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील जानी गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून, एका दारुड्याने 100 वर्षांच्या वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. यामुळे या महिलेचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानी गावात ही महिला आपल्या भावासोबत राहत होती. सोमवारी दारुच्या नशेत असलेल्या अंकित पुनिया याने या महिलेवर बलात्कार केला. महिलेचा रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर तिच्या भावाने व गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. बलात्कार झाल्यानंतर अत्यावस्थ अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

आरोपी अंकित पुनिया याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकितकडून मात्र आपण निर्दोष असल्याचे सांगण्यात येत आहे. हे कृत्य मी केले नसल्याचे त्याचे म्हणणे आहे.

Web Title: Meerut: 100-year-old woman raped by drunk man, dies