'होय यामुळेच मेरठचे एसपी म्हणाले, पाकिस्तानमध्ये निघून जा'

वृत्तसंस्था
शनिवार, 28 डिसेंबर 2019

त्यादिवशी तेथील परिस्थिती खूप वाईट होती. काही जणांना जीव गमवावा लागला होता व जाळपोळ करण्यात येत होती. आंदोलनकर्त्यांकडून भारतविरोधा घोषणा देण्यात येत होत्या.

मेरठ : लखनौमधील नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनादरम्यान मेरठचे पोलिस अधीक्षक अखिलेश नारायण सिंह आंदोलकांना पाकिस्तानमध्ये निघून जा असे म्हटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. भारतविरोधी घोषणा देण्यात येत असल्यानेच त्यांनी तसे वक्तव्य केल्याचे कुमार यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लखनौमध्ये 20 डिसेंबरला सीएए विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेरठचे पोलिस अधीक्षक अखिलेश सिंह हे आंदोलनकर्त्यांना पाकिस्तानमध्ये निघून जा, असे बोलताना दिसत आहेत. या व्हिडिओवरून उत्तर प्रदेश पोलिसांना लक्ष्य करण्यात येत आहे. 

व्यंगचित्रकार मित्राच्या निधनाने राज ठाकरे हळहळले

या व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना प्रशांत कुमार म्हणाले, की त्यादिवशी तेथील परिस्थिती खूप वाईट होती. काही जणांना जीव गमवावा लागला होता व जाळपोळ करण्यात येत होती. आंदोलनकर्त्यांकडून भारतविरोधा घोषणा देण्यात येत होत्या. तसेच पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात येत होत्या. त्यामुळे ते पाकिस्तानमध्ये निघून जा असे म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meerut ADG statement on SP controversial video said anti india slogans