गोवा - खाणप्रश्नी पर्रीकरांची आमदारांबरोबर बैठक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

गोवा : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्यातील खाणकाम बंद झाल्याने खाण अवलंबित बेरोजगार झाले आहेत. खाणी सुरू व्हाव्यात त्यांनी राज्यात धरणे आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत उपचार घेऊन परतलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज सकाळी खाण क्षेत्रातील आमदारांची बैठक घेऊन खाणप्रश्नसंदर्भात चर्चा केली.

या बैठकीला सभापती प्रमोद सावंत, आमदार राजेश पाटणेकर, आमदार दिपक पावस्कर, आमदार प्रवीण झांट्ये व आमदार प्रसाद गावकर हे उपस्थित होते. खाणप्रश्नाशी संबंधित असलेल्या व उपस्थित नसलेल्या आमदारानाही भेटणार आहे. या चर्चेतून समोर आलेले पर्यायाबाबत मुख्यमंत्री पुढील आठवड्यात पंतप्रधानांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

Web Title: meeting for mining issue between chief minister parrikar and mal of goa