मेहबुबा मुफ्ती स्थानिक दहशतवाद्यांना म्हणतात भूमिपुत्र

वृत्तसंस्था
बुधवार, 16 जानेवारी 2019

श्रीनगरः काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत. काश्मिरमधील दहशतवादी हे भूमिपुत्र आहेत, असे वक्तव्य जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि 'पीडीपी' पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी केल्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.

अनंतनाग येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मेहबुबा मुप्ती म्हणाल्या, जम्मू-काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केवळ फुटीरतावादी नेत्यांशी चर्चा करणे पुरेसे नाही. दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांशी चर्चा करुन प्रश्न सोडवायला हवा. आपल्याला यश मिळेल, हा विचार करुन 2014 निवडणुकांच्या आधी काँग्रेसने अफझल गुरुला फाशी दिली होती. भाजपही आज त्यांची पुनरावृत्ती करत असून, त्यांनी कन्हैया कुमार, उमर खलिद आणि जम्मू काश्मिरच्या सात-आठ विद्यार्थ्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.'

सरकारने लवकरात लवकर दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी चर्चा करायला हवी. स्थानिक दहशतवादी हे भूमिपुत्र आहेत, असेही मेहबुबा मुप्ती म्हणाल्या. दरम्यान, मेहबुबा मुप्ती यांच्या वक्तव्यानंतर खळबळ उडाली. मुफ्ती यांचे हे वक्तव्य म्हणजे पब्लिसिटी स्टंट आहे, अशी प्रतिक्रिया भाजपने दिली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mehbooba Mufti calls local militants sons of soil