BREAKING:माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची नजरकैदेतून सुटका

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 13 October 2020

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मागील वर्षी ऑगस्टमध्ये त्यांना नजरकैदेत करण्यात आले होते.

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मागील वर्षी ऑगस्टपासून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मेहबुबा मुफ्ती यांची सुटका होत असल्याची माहिती जम्मू-काश्मीर प्रशासनाचे प्रवक्ता रोहित कंसल यांनी दिली आहे. 

मागील वर्षी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यात आल्यानंतर अनेक प्रमुख नेत्यांना ताब्यात घेण्यात आले होते. यामध्ये माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याही समावेश होता. मुफ्ती यांच्यासह फारुका अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला या नेत्यांनाही नजरकैद ठेवण्यात आले होते. या नेत्यांना याआधी सोडून देण्यात आले आहे.

मुफ्ती यांना पीएसए stringent Public Safety Act (PSA) अॅक्टनुसार नजरकैदेत ठेवण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली डेडलाईल संपण्याच्या काही दिवस अगोदर त्यांची सुटका करण्यात आली आहे. न्यायालयाने सप्टेंबरमध्ये केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाला  प्रश्न केला होता की, 'आणखी किती दिवस मेहबुबा मुक्ती यांना नजरकैदत ठेवण्यात येणार आहे?'

मुफ्ती यांच्या सुटकेची पुष्टी त्यांची मुलगी इल्किजा मुफ्ती यांनी केली आहे. या काळात आमच्यासोबत राहिल्याबद्दल सर्वांचे आभार. देव तुम्हा सर्वांना सुरक्षा पुरवो, असं त्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत. इल्तिजा यांनी मेहबुबा मुफ्ती यांच्या ट्विटर हँटलवरुन ही माहिती दिली आहे. त्या गेल्या एक वर्षापासून त्यांच्या आईचे ट्विटर हँटल वापरत आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mehbooba Mufti In Detention Since August Last Year Released