'काश्‍मीरचे गृह मंत्रालय मुफ्तींकडे; मग त्यांनीही राजीनामा द्यावा'

वृत्तसंस्था
सोमवार, 16 एप्रिल 2018

श्रीनगर : 'कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरणाची जबाबदारी घेत जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी राजीनामा दिला पाहिजे', अशी मागणी भाजपचे आमदार आणि मुफ्ती मंत्रिमंडळातील माजी मंत्री लालसिंह यांनी केली. कठुआ बलात्कार प्रकरणातील आरोपींना पाठिंबा दिल्यामुळे लालसिंह यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. 

आरोपींना पाठिंबा देण्यासाठी 'हिंदू एकता मंच'ने गेल्या महिन्यात काढलेल्या एका मोर्चास लालसिंह आणि त्यांचे सहकारी चंद्रप्रकाश गंगा यांनी हजेरी लावली होती. 'एका मुलीच्या मृत्युवरून इतका गदारोळ घालण्याची काय गरज आहे? इथे अशा अनेक मुलींचे मृत्यू झाले आहेत', असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी या मोर्चामध्ये केले होते. यावरून देशभरातून या दोन नेत्यांवर आणि भाजपवर कडाडून टीका झाली होती. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. 

'मेहबुबा मुफ्ती यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. त्यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागणाऱ्या दोन मंत्र्यांनी असा काय गुन्हा केला होता? देशात शांतता राहावी, म्हणून आम्ही दोघांनी राजीनामे दिले. आम्हाला त्या मुलीविषयी सहानुभूती आहे. तिला न्याय मिळावा, अशीच आमची इच्छा आहे. ती मुलगी बेपत्ता झाल्यानंतर सात दिवस तिच्याबद्दल काहीही माहिती समजली नाही. राज्याचे गृहमंत्रालय मुफ्ती यांच्याकडेच आहे. मग या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे', अशी मागणी लालसिंह यांनी केली. 

कठुआ प्रकरणात आजपासून सत्र न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होणार आहे. 

Web Title: Mehbooba Mufti Must Resign Over Kathua, demands BJP minister