मेहबूबा मुफ्तींचा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 जून 2018

भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढून घेत सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही मिनिटांतच मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा आज (मंगळवार) दिला. 'पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी' (पीडीपी) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांचे युती सरकार राज्यात सत्तेवर होते. मात्र, भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढून घेत सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही मिनिटांतच मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 

भाजपने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर भाजप जम्मू-काश्मीरच्या सत्तेतून बाहेर पडत असल्याचे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते राम माधव यांनी सांगितले. या घोषणेनंतर मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.  
 

Web Title: Mehbooba Mufti Resign as Jammu Kashmir Chief Minister