काश्‍मिरी जनेतेने सहनशक्तीचा अंत पाहू नये: मेहबुबा मुफ्ती

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 जून 2017

असेच वातावरण राहिले; तर काश्‍मीरमध्ये याधीची परिस्थिती पुन्हा एकदा अवतरेल. नागरिक रस्त्यांवर पोलिसांची गाडी दिसली, की पळ काढतील

नवी दिल्ली - जम्मु काश्‍मीर राज्याची राजधानी असलेल्या श्रीनगर येथे एका पोलिस अधिकाऱ्याची जमावाकडून क्रूर हत्या करण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना राज्याच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी काश्‍मिरी जनतेने सहनशक्तीचा अंत पाहू नये, असा संतप्त इशारा आज (शुक्रवार) दिला.

"काश्‍मीरमधील सुरक्षा दलांच्या सहनशक्तीचा हा निकाल असेल; तर यापुढे परिस्थिती अत्यंत कठीण होईल. मात्र यापेक्षा जास्त लज्जास्पद घटना असू शकत नाही. पंडित हे यावेळी नागरिकांचे संरक्षण करत होते. यानंतरही असेच वातावरण राहिले; तर काश्‍मीरमध्ये याधीची परिस्थिती पुन्हा एकदा अवतरेल. नागरिक रस्त्यांवर पोलिसांची गाडी दिसली, की पळ काढतील. काश्‍मीरमधील पोलिस दल हे देशातील सर्वोत्कृष्ट पोलिस दलांपैकी एक आहे. आपण आपल्याच नागरिकांविरोधात कारवाई करत आहोत, याची जाणीव त्यांना असल्याने त्यांच्याकडून संयम पाळला जात आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. जनतेने बदलावे,'' अशी कठोर प्रतिक्रिया मुफ्ती यांनी या पार्श्‍वभूमीवर व्यक्त केली.

आज (शुक्रवार) सकाळी काश्‍मीरमधील पोलिस अधीक्षक मोहम्मद आयुब पंडित यांची संतप्त जमावाने दगडफेक करुन हत्या केली. येथील जमिया मशिदीबाहेर जमलेल्या जमावावर त्यांनी गोळीबार केल्याच्या संशयामुळे त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर, मुफ्ती यांनी हा इशारा दिला आहे.

■ 'ई सकाळ'वरील ताज्या बातम्या
इस्रोकडून एकावेळी तब्बल 31 उपग्रह अवकाशात प्रक्षेपित
एक लाखापर्यंत पूर्ण कर्जमाफी शक्‍य
बीडः पंचायत समितीच्या माजी सभापतीने केला गोळीबार
नीट परिक्षेत पंजाबचा नवदीप पहिला; महाराष्ट्रातून अभिषेक पहिला
रामनाथ कोंविंद यांनी भरला राष्ट्रपती निवडणुकीचा अर्ज
पानशेत, वरसगाव, टेमघर: तेवीस दिवसांत 100 मिलिमीटर पाऊस
औरंगाबाद : आळंद येथे टेम्पोची कारला धडक; 1 गंभीर
विधवांच्या आयुष्यात येतोय आशेचा किरण!
तुकाराम महाराज पालखी मार्गावर वाहतुकीचा बोजवारा
आमदार गजबेंच्या अंगरक्षकाची गोळी झाडून आत्महत्या
दारू व्यावसायिकाकडून लाच घेताना पाेलिसाला अटक
एकतर्फी प्रेमातून शिक्षकाला मारहाण

Web Title: Mehbooba Mufti warns Kashmiris against abusing 'restraint shown by police'