कठुआ प्रकरणाच्या सुनावणीसाठी जलदगती न्यायालय स्थापन करा : मेहबूबा मुफ्ती

वृत्तसंस्था
शनिवार, 14 एप्रिल 2018

कठुआ येथील सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणानंतर मुख्यमंत्री मुफ्ती यांनी विशेष जलदगती न्यायालयाची स्थापना करावी, अशी मागणी जम्मू काश्मीरच्या मुख्य न्यायाधीशांकडे केली.

जम्मू : कठुआ बलात्कार आणि हत्याप्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळत आहे. याप्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) घेण्यात यावी, अशी मागणी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू काश्मीर उच्च न्यायालयात केली. याबाबतची मागणी मुफ्ती यांनी जम्मू काश्मीरच्या मुख्य न्यायाधीशांकडे केली आहे. Kathua

कठुआ येथील सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणानंतर मुख्यमंत्री मुफ्ती यांनी विशेष जलदगती न्यायालयाची स्थापना करावी, अशी मागणी जम्मू काश्मीरच्या मुख्य न्यायाधीशांकडे केली. राज्य सरकारकडून या गंभीर घटनेची दखल घेण्यात आली असून, या गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या पोलिसांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

याबाबत विशेष तपास पथकाने गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आठ पोलिसांना अटक केली. यामध्ये दोन विशेष पोलिस अधिकारी आणि हेड कॉन्स्टेबलचा समावेश आहे. या सर्वांवर पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 

Web Title: Mehbooba Mufti writes to Jammu and Kashmir High Court to set up fast track court for hearing Kathua rape case