काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तींच्या ताफ्यावर दगडफेक

Mehbooba Muftis Convoy Attacked With Stones In Kashmirs Anantnag
Mehbooba Muftis Convoy Attacked With Stones In Kashmirs Anantnag

श्रीनगर: जम्मू आणि काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि "पीडीपी'च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्या ताफ्यावर आज (सोमवार) अनंतनाग जिल्ह्यात दगडफेक करण्यात आली.

खिर्रम येथील दर्ग्याला भेट देऊन परतत असताना ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत मुफ्ती यांच्या वाहनांच्या ताफ्यातील एका गाडीचे नुकसान झाले असून, चालक जखमी झाला आहे. मुफ्ती यांना कुठलीही इजा झालेली नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मुफ्ती या अनंतनाग मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवीत आहेत. याच मतदारसंघात 2014 मध्ये त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत विजय संपादन केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com