पाकने दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे : मेहबूबा मुफ्ती

वृत्तसंस्था
बुधवार, 5 एप्रिल 2017

श्रीनगर : ''पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे, जेणेकरून राज्यात शांतता प्रस्थापित करता येईल व चर्चेची प्रक्रिया सुरू करता येईल, असे प्रतिपादन जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज केले. 

अनंतनाग लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी दोरू येथे झालेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. येथून मेहबूबा यांचे बंधू मुफ्ती तसदुक हुसेन हे 'पीडीपी'च्या वतीने निवडणूक लढवित आहेत.

त्या म्हणाल्या, ''सीमेपलीकडील देशाला माझे आवाहन आहे, त्यांनी दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्हाला मदत करावी. त्यानंतर येथे व पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये चर्चेची प्रक्रिया सुरू करता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर डिसेंबर 2015 मध्ये नवाज शरीफ यांना भेटण्यासाठी लाहोरला गेले होते. यातून दोन देशांतील संबंध सुधारण्याच्या आशा निर्माण झाल्या होत्या.

मात्र, दुर्दैवाने पठाणकोट येथे दहशतवादी हल्ला झाला. अर्थात कोणतीही वेळ सारखी राहात नाही. माजी पंतप्रधान वाजपेयी नेहमी म्हणत तुम्ही मित्र बदलू शकता; पण शेजारी बदलू शकत नाही. त्यामुळे आपल्याला एकमेकांच्या सहकार्याने राहावे लागेल.''

Web Title: Mehbuba Mufti asks Pakistan to stop supporting terrorism