मेहुल चोक्सीला वाचवण्यासाठी भावाचा प्रयत्न

Mehul Choski's  run away from Antigua
Mehul Choski's run away from Antigua
Summary

पीएनबी घोटाळ्यातील (PNB Scam) प्रमुख फरार आरोपी आणि फरार व्यायसायिक मेहुल चोक्सी (Mehul Choksi) सध्या डोमिनिकाच्या तुरुंगात बंद आहे. भारत सरकार त्याला परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे

नवी दिल्ली- पीएनबी घोटाळ्यातील (PNB Scam) प्रमुख फरार आरोपी आणि फरार व्यायसायिक मेहुल चोक्सी (Mehul Choksi) सध्या डोमिनिकाच्या तुरुंगात बंद आहे. भारत सरकार त्याला परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यातच अँटिग्वाचे ऑनलाईन पोर्टल असोसिएट्स टाईम्सने एक बातमी प्रसिद्ध केली आहे. बातमीनुसार, मेहुल चोक्सीचा भाऊ चेतन चीनू चोक्सी (Chetan Choksi) 29 मे रोजी प्रायवेट जेटने डोमिनिया पोहोचला होता. त्याने स्थानिक विरोधी पक्षनेते लेनोक्स लिंटन यांची भेट घेतली होती. असोसिएट्स टाईम्सचा दावा आहे की, चेतन चोक्सीने डोमिनिकाचे विरोधी पक्षनेते लेनोक्स लिंटन यांना 2 लाख अमेरिकी डॉलरची लाच दिली. (mehul choksi brother chetan bribed dominica opposition leader)

चेतनने लेनोक्स यांना आगामी निवडणुकीत मदत करण्याचा विश्वास दिला आहे. बातमीनुसार, चेतनने लिंटन यांना मेहुल चोक्सी प्रकरणी तेथील संसदेत आवाज उठवण्यास सांगितलं आहे आणि मेहुल चोक्सीला पाठिंबा देण्यास सांगितलं आहे. माहितीनुसार चेतन Diminco NV नावाची एक कंपनी चालवतो. ही कंपनी हाँगकाँगची Digico Holdings Limited ची सहयोगी कंपनी आहे. हिरे आणि दागिन्यासंबंधीच्या व्यापारासाठी ही कंपनी प्रसिद्ध आहे. असे सांगितलं जातं की, लंडनमध्ये निरव मोदीच्या सुनावणीवेळीही चेतनला कोर्टाबाहेर पाहण्यात आलं होतं.

Mehul Choski's  run away from Antigua
मोठा निर्णय! परदेशातील लशींच्या वापराचा मार्ग मोकळा

लेनोक्स लिंटन यांनी मेहुल चोक्सी प्रकरणी चौकशीची केली मागणी

हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, डोमिनिकाच्या यूनायटेड वर्कर्स पार्टीचे नेता लेनोक्स लिंटन यांनी मेहुल चोक्सी प्रकरणी तपासाची मागणी केली आहे. त्यांनी पोलिस आणि सरकारमधील या प्रकरणाशी संबंधित मंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. डोमिनिकाच्या पंतप्रधानांनीही यासंदर्भात लेनोक्स लिंटनवर टीका केली आहे.

मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी CBI आणि ED ची टीम भारतातून रवाना झाली आहे. कॉमनवेल्थ ऑफ डोमिनिकाच्या कोर्टात बुधवारी मेहुल चोक्सी प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी ही टीम कोर्टामध्ये हजर राहील. डोमिनिकामध्ये गेलेल्या CBI आणि ED टीममध्ये मुंबई झोनचे तपास अधिकारी आहेत. मेहुल चोक्सीच्या टीमकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेनंतर कॉमनवेल्थ ऑफ डोमिनिकाच्या कोर्टाने 2 जूनपर्यंत सुनावणी होईपर्यंत त्याला डोमिनिकाच्या बाहेर नेण्यावर बंदी आणली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com