चोक्सी लवकरच ताब्यात येईल

मंत्रालयाच्या साप्ताहिक वार्तालापदरम्यान प्रवक्ते अरिंदम बागची यांनी चोक्सीच्या प्रत्यार्पणासह व्हॅक्सिन पासपोर्ट, जाधव प्रकरणाबद्दलही देशाची भूमिका मांडली.
Mehul Choksi
Mehul ChoksiSakal

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहार (PNB Scam) प्रकरणातील फरार गुन्हेगार (Criminal) मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याला भारतात (India) परत आणण्यासाठी डोमेनिका सरकारशी सुरू असलेल्या वाटाघाटींचा सकारात्मक निष्कर्ष लवकरच समोर येईल, असा दावा परराष्ट्र मंत्रालयाने (Foreign Minister) आज केला. कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालाचे पालन पाकिस्तानने करावे, असा इशाराही देण्यात आला. (Mehul Choksi will be Arrested Soon)

मंत्रालयाच्या साप्ताहिक वार्तालापदरम्यान प्रवक्ते अरिंदम बागची यांनी चोक्सीच्या प्रत्यार्पणासह व्हॅक्सिन पासपोर्ट, जाधव प्रकरणाबद्दलही देशाची भूमिका मांडली. चोक्सीबाबत ते म्हणाले की, भारतातर्फे कायदेशीर कारवाई सुरू आहे. चोक्सीला लवकरात लवकर आणून त्याच्यावर खटला चालविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Mehul Choksi
नताशा नरवाल, देवांगना कलिता यांची तिहार तुरुंगातून सुटका!

अफगाणिस्तानातील शांतता प्रक्रियेवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी नुकत्याच झालेल्या कतार दौऱ्यामध्ये अमेरिकेचे प्रतिनिधी झाल्माय खालीझाद यांच्याशी केलेल्या चर्चेचीही माहिती बागची यांनी दिली. तर, भारत पाकिस्तानने काल दीर्घकाळापासून रखडलेल्या असाईनमेन्ट व्हिसाला मंजुरी दिली आहे. त्याची माहिती देताना बागची यांनी हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी तुरुंगात अडकून पडलेल्या जाधव यांच्या सुटकेसाठीच्या प्रयत्नांबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अंमलबजावणीसाठी पाकिस्तान सरकारने मंजूर केलेल्या आयसीजे आढावा आणि पुनर्विचार विधेयकातील त्रूटी दूर कराव्यात. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाचे पाकला शब्दशः पालन करावे लागेल. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार देताना पाकिस्तानला फटकारले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com